अक्कलकोट : तालुक्यातील वागदरी येथील श्रुतिका दत्तात्रय वारनाळे हिला लातूर जिल्ह्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिच्या वर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.*
बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या श्रुतिका वरनाळे मागील तीन वर्षे महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संशोधन, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात तिने महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत कौशल्याची छाप पाडली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे
या यशामागे प्रा. शिवशंकर वागदरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल आहे. श्रुतिका वरनाळे हिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश हिंडोळे, ज्येष्ठ समाजसेवक दयानंद बिडवे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य शिवशरण जोजन, रवी कुमार वरनाळे, दत्तात्रय वारनाळे, ललिता वरनाळे यांच्यासह आदीनी कु.श्रुतिका वरनाळे हिच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करुन अभिनंदन केले आहे ..






















