सांगोला – नाणीजधामचे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या पादुकांचे दर्शन सोहळा उद्या शुक्रवार दि.२० फेब्रुवारी रोजी स.१० वा. सांगोला शहरातील वाढेगाव रोड येथील रामकृष्ण गार्डन व्हिला येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सचिन काकडे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे, सचिव मारुती भोसले, अध्यात्मिक प्रमुख शरद मते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर शितोळे, विशेष कार्यवाहक सचिव भारत राऊत, सामाजिक उपक्रम प्रमुख दत्ता बनकर, सांगोला तालुका अध्यक्षा मीनाक्षी राऊत, तालुका कॅप्टन अविनाश शिंदे उपस्थित होते.
सोहळ्यानिमित्त स.९ वा. सांगोला शहरातून पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर संतपीठावर पादुकांचे आगमन होईल. दिवसभर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दीक्षा, आरती पुष्पवृष्टी व दर्शन सोहळा पार पडणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू तसेच शेतकऱ्यांसाठी २० लिटर क्षमतेचे एकूण ७५ स्प्रे (फवारणी) पंपांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाविक, भक्त, शिष्य व साधक बंधू-भगिनींनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट-
जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे उपक्रम
– विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका २४ तास मोफत सेवा
– सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाहन प्रशिक्षण
– विक्रमी १ लाख ७१ हजार १५० बाटल्या रक्तसंकलन
– ५ हजार वनराई बंधारे तसेच १ लाख २५ हजार झाडांचे वृक्षारोपण
– नाणिज येथे पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमातून गरीब मुलांना मोफत शिक्षण
– आजपर्यंत १७७ लोकांचे मरणोत्तर देहदान व १२७ लोकांचे अवयवदान
– ब्लड इन नीड या माध्यमातून २५ हजार रुग्णांना मोफत रक्त



















