सोलापूर – 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 रोजी SGPDA पार्किंग लॉट स्केटिंग रिंक मडगाव दक्षिण गोवा आयोजित आंतरराष्ट्रीय ओपन रोलर स्केटिंक स्पोर्ट्स प्रमोशन टूर्नामेंट 2026-27 च्या चाचणीमध्ये व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या कु लास्या नरेंद्र शेरलाची निवड झाली.
SGF गोवा स्केटिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणात प्रदान करण्यात आला. या खेळाडूला शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील व मोनिका जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूला संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सुप्रिया बोम्मा व सर्व शिक्षक वृंद कौतुक केले
























