Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दादा-आबांसारखे ज्येष्ठ पाठिशी उभे राहिल्यामुळेच मुंडे साहेबांच्या दुःखातून सावरू शकले….

कार्यकर्त्यांशी माझं नातं संस्काराचं ; ही सोन्यासारखी माणसं जपायचीतं....

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 2, 2023
in marathwada
0
दादा-आबांसारखे ज्येष्ठ पाठिशी उभे  राहिल्यामुळेच मुंडे साहेबांच्या दुःखातून सावरू शकले….
0
SHARES
187
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परळी वैजनाथ : – लोकनेते मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तरूण कार्यकर्त्यांबरोबरच ज्येष्ठांचंही नेतृत्व माझ्याकडं आलं. तो काळ तसा कठीणच होता, पण साहेबांच्या पश्चात राजकारणात दादा-आबांसारखे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, माझ्या प्रत्येक निर्णयात, संकटात आणि संघर्षात सोबत राहिल्यामुळेच मला साहेबांच्या जाण्याचं दुःख पचवता आलं शिवाय राजकारणातला प्रवास इथपर्यंत करता आला. ही माणसं सोन्यासारखी आहेत, त्यांना आपण सर्वांनी मिळून जपायचं आहे असे भावोदगार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे काढले.

शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे (दादा) आणि दत्तापा इटके (आबा) यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल भाजपच्या वतीने त्यांचा आज अमृत महोत्सवानिमित्त पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ह्दय सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर गौरवमूर्ती इटके, डुबे यांच्यासह जयमाला डुबे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदराव केंद्रे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, स्वागताध्यक्ष तथा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर पंकजाताई मुंडे यांच्याहस्ते दत्ताप्पा इटके आणि विकासराव दुबे यांचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात औक्षण करण्यात आले.

यावेळी बोलतांना पंकजाताई पुढे म्हणाल्या, जेव्हापासून राजकारण बघते आहे तेंव्हापासून काही चेहरे राजकारणात कायम दिसतात, दत्ताप्पा आणि डुबे काका यांचा ही यात समावेश आहे. त्यांच्या जीवनकार्याला वंदन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, आजचा हा सोहळा बघून माझे मन भरून आलं आहे. आपण सर्व रक्ताच्या आणि पक्षाच्या नात्याने नाही तर संस्कारांच्या नात्याने इथे एकत्र आलो आहोत. परळी शहरात अशा प्रकारचं वातावरण कायम रहावं अशी प्रार्थना वैद्यनाथकडे करते असे त्या म्हणाल्या.

लकीरे हमारी भी खास है…!
पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, अमृता सारख्या सज्जन माणसांचा सहवास आपल्याला लाभला आहे. सज्जन माणूस बोलत नसला तरी त्यांचा आवाज फार मोठा असतो. त्यांचा आवाज कुणी दाबू शकत नाही. ही सर्व सज्जन आणि अमृतासारखी माणसे माझ्या पाठीशी आहेत म्हणून माझा आवाज कुणी दाबू शकत नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर या माणसांची साथ मला कायम मिळत गेली. आज जेंव्हा दत्ताप्पा आणि विकास काकांच्या जीवनकार्याची चित्रफीत बघितली तेंव्हा मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण आली. मुंडे साहेब जर आज आपल्यात असते तर म्हणाले असते “लकीरे हमारी भी बहोत खास है क्यूँ की आप जैसे हमारे साथ है”.या सोहळ्याच्या माध्यमातून डुबे आणि इटके काकांसारख्या कर्मयोगी माणसांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले. आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एकत्र असण्यासारखे दुसरे कोणतेही मोठे सुख नाही. त्यांचे कुटुंब एकत्र आहे, हे सुख बघत बघत त्यांनी आयुष्याची शंभरावी साजरी करावी अशा सदिच्छा देते असं त्या म्हणाल्या.

पंकजाताईचं भविष्य उज्ज्वल ; त्यांना अजून मोठा नेता झालेलं पहायचयं – इटके गुरूजी
पंकजाताई आपल्या सर्वांच्या नेत्या आहेत, त्यांनी पालकमंत्री असताना केलेलं काम विसरता येणं शक्य नाही. पंकजाताई मुख्यमंत्री पदापर्यंत पोचाव्यात अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे, अशा नेतृत्वासाठी आपण आपले काम चालूच ठेवायचे आहे, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रितमताई देखील खासदार म्हणून उत्तम काम करत आहेत, या दोघीही आपल्या पाठिशी असल्याने आपल्याला भितीचे काहीच कारण नाही असे इटके गुरूजी सत्काराला उत्तर देताना म्हणाले. तर डुबे यांनी समाज सेवा करण्यासाठी आपली साथ कायम मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पंकजाताई आणि दोन्ही परिवाराच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक, व्यापारी, महिला व भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 195
Previous Post

आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक…

Next Post

पंढरपूर:- करकंब परिसरात एकाच दिवशी २ विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपूर:- करकंब परिसरात एकाच दिवशी २ विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू.

पंढरपूर:- करकंब परिसरात एकाच दिवशी २ विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू.

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896467

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697