अकलुज – नुकतेच अकलुज येथील शिवजयंती मिरवणुकीत नियमापेक्षा अधिक प्रमाणात आवाजात डिजे वाजवुन सार्वजनिंक शांतता भंग करुन ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल 11 जयंती मंडळे व डिजे मालकावर कारवाई केल्या नंतर,यापुढे कोणत्याही सण उत्सवात कर्कश आवाजात डिजे वाजवुन ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल असा कडक इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिला आहे.
डिजे मुळे होणारी शांतता भंग व ध्वनीप्रदुषण यामुळे नागरीकांना होणाऱ्या त्रासामुळे संबधित आयोजकांच्या विरुद्ध पोलीसांनकडे तक्रारी येत आहेत.या अनुषंगाने पत्रकारांशी वार्तालाप करताना माळशिरस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके म्हणाले,
आवाजात डिजे वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले आसतानाही महामानवांची जयंती,अन्य समारंभ व लग्नात कर्कश आवाजात डिजे वाजवले जात आहेत. नुकतेच शिवजयंती मिरवणुकीत नियमापेक्षा अधिक प्रमाणात आवाजात डिजे वाजवुन सार्वजनिंक शांतता भंग करुन ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल अकलुज पोलीसांनी 11 जयंती मंडळे व डिजे मालकावर गुन्हे दाखल करुन कारवाई केली आहे.
सद्या पोलीसांनी मंडळाचे अध्यक्ष व डिजे मालक यांचेवर जरी गुन्हे दाखल केले असले तरी,पोलीसांनी घटनास्थळाच्या केलेल्या चित्रीकरणाचा तपास करुन सहभागी कार्यकर्त्यांनवरही गुन्हे दाखल केले जातील. तसेच डिजेच्या वाहनावरही परीवहन कार्यालाशी पत्रव्यवहार करुन जास्तीत जास्त दंड आकरला जाणार आहे.
कोणत्याही सण उत्सवाच्या पुर्वी सर्व मंडळांना बोलवुन आवाजाच्या मर्यादे संदर्भात पोलीसांन कडून नोटीस दिली जाते.तरी सुद्धा पोलिसांच्या सुचनेचं उल्लंघन होतं आहे,यापुढे ज्याही ठिकाणी 75 डिसेबल पेक्षा जास्त आवाजात कोणतेही वाद्य वाजवल्यास पोलीस कारवाई अटळ आहे असा कडक इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिला.























