सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्था अध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजित इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, रेवणील ब्लड बँक सांगोलाचे अध्यक्ष सोमेश यावलकर यांच्या हस्ते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.एस.पी.जोकार, प्रा.ए.व्ही.सपाटे, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रेवणील ब्लड बँकचे सर्व कर्मचारी यांचे योगदान लाभले.






















