सांगोला – महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा विभाग व समितीच्यावतीने आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक प्रा.जगदीश चेडे, क्रीडा समिती सदस्य डॉ.मालोजी जगताप, डॉ.अमोल पवार, प्रा.वासुदेव वलेकर, प्रा.विधीन कांबळे, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा.विजय यादव, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.सोनल भुंजे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडेमधील सहभागाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीसाठी क्रीडा आवश्यक असल्याचे डॉ.सुरेश भोसले यांनी सांगितले. यंदाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, खो-खो, बुद्धिबळ, कबड्डी, बॅडमिंटन, रस्सीखेच तसेच ॲथलेटिक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेता संघांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.






















