सोलापूर : महापौर पदी विनायक कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने त्यांच्या सत्कार फेटा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील मूलभूत सुविधा, विकास कामे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न व सोलापूर शहराच्या विकासाला एक नवीन उंचीवर घेऊन जाल. आपली वाटचाल यशस्वी होवो अशा प्रकारच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सचिव इरफान शेख, भीमा मस्के उपस्थित होते.
























