श्रीपूर – राज्यातील एकूण १४ शेती महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या साठी येत्या १७ मार्च रोजी पुणे येथिल मुख्यालयावर विराट मोर्चाचे कामगार नेते शुभाष कुलकर्णी यांचे नेतृत्वात आयोजन केले असून या मोर्चात मोठ्या प्रमाणावर कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीपूर येथिल कामगार संघटनेचे भालचंद्र शिन्दे यांनी केले आहे .
अधिक माहिती देताना महामंडळातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्त होई पर्यंत अल्य पगारात काम करावे लागले . त्यामुळे प्रपंच , मुलांचे शिक्षण कसे बसे करता आले त्यामुळे राहण्यासाठी एखादा गुंठा घेणे मुश्किल होते . फरकाची , बोनसचे रकमेसाठी न्यायालयात जावे लागले यात रामराजे निंबाळकर यांच्या कमिटीच्या शिफारशि प्रमाणे प्रत्येक कामगारांना दोन गुंठे जागा व घर बांधून देणेचे न्यायालयात आश्वासन देवूनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही मात्र राज्य सरकारने एमआयडीसी साठी अडीच हजार तर ग्रामपंचायती साठी पाचशे एकर जागा विनामुल्य दिली आहे .
या अन्यायाविरुद्ध पुणे येथिल शेती महामंडळाच्या कामगारांना दोन गुंठे जागा देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून देण्यात यावी.चौथा , पाचवा व सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा न्यायालयीन निर्णयाप्रमाणे समान कामात समान वेतन मिळावे औद्योगिक न्यायालय अहिल्यानगर यांचे निर्णयाप्रमाणे सन २०१८ रोजी हजेरी पटावर असलेल्या रोजंदार कामगारांना वर्षाला पंधरा दिवस नुकसान भरपाई व तीन महिन्याचा ज्यादा पगार देण्याचा आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी.
रोजंदार सेवानिवृत्त कामगारांना न्यायालय निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी.तसेच कामगारांची थकीत देणे अद्याप मिळाली नाहीत ती तातडीने द्यावी अशा कामगारांच्या मागण्या असून मागण्या मान्य होई पर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.त्यावेळी पुणे जिल्हा प्रमुख सागर मिसाळ ,राजू पठाण , बाळू शिंगाडे, काटे , ॲड . संजय चंदनशिवे,,युवराज रनवरे मिराज मुलानी आकाश पवार दादा भालेराव शफी पठाण,जाडकर ,शंकर मोरे,आबा कांबळे, उपस्थित होते .



















