अक्कलकोट – तालुक्यातील तडवळ येथील ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ च्या सांगता समारंभाचा कार्यक्रम संचालक ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला.
चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाने या हंगामात कारखान्याने उल्लेखनीय कामगिरी करत ६.८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप, १०.८६% सरासरी उतारा, ४.४२ कोटी युनिट वीज निर्मिती व २.८० कोटी युनिट वीज निर्यात केली आहे.यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे जनरल मॅनेजर व्हि.एम.गायकवाड व सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























