Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जवळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in social
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी –  तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे जवळगाव व हिंगणी हे दोन मध्यम प्रकल्प दीर्घकाळापासून दुरुस्तीअभावी दुर्लक्षित राहिले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित कामांना गती देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरु झाल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे.

जवळगाव व हिंगणी हे दोन्ही प्रकल्प बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मुख्य आधार आहेत. तसेच अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही या प्रकल्पांवर अवलंबून आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून मुख्य कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या या कालव्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती होत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

दोन्ही प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या नियामक मंडळाच्या ११० व्या बैठकीत दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रम (MIIP) फेज-२ अंतर्गत राज्यातील १५५ प्रकल्पांमध्येही जवळगाव व हिंगणी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत होती.

 या अनुषंगाने आमदार दिलीप सोपल यांनी दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य, यांना पत्राद्वारे सविस्तर मागणी सादर केली होती. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता देणे व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती, कालव्यांतील गळती, दुरुस्तीची तातडीची गरज आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 या बैठकीनंतर आमदार दिलीप सोपल यांनी माहिती देताना सांगितले की, जवळगांव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यासाठी आवश्यक अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास शासन स्तरावर गती दिली जाणार असून, मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देऊन  कामे तातडीने मार्गी लावण्यास सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालव्यांतील गळती रोखली गेल्यास पाण्याचा अपव्यय थांबून सिंचन व्यवस्थेत सुधारणा होईल. परिणामी शेती उत्पादन वाढीस लागून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.

Post Views: 14
Previous Post

सायकलिंग क्लबचा सुरज मुंढे ‘चॅलेंज लेपरेटल’ या नामांकित पुरस्कारासाठी पात्र

Next Post

आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाचा दमदार विजय; लक्ष्मी मानेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाचा दमदार विजय; लक्ष्मी मानेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

सोलापूरचे ७१ पैकी ११ पर्यटक भारतात परतले. #public #viral #dubai #iran #युद्ध #indian

March 5, 2026

४३३ विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभाग… #yoga #viral #पब्लिक

March 5, 2026

अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश; कृषी अधिकारी पदासाठी निवड.

March 5, 2026

भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहील : प्रा. नानासाहेब गव्हाणे

March 5, 2026

करजगी एमएसईबी येथील सुरक्षा गार्ड माजी सैनिक श्रीकांत मोरे सेवानिवृत्त

March 5, 2026

अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

March 5, 2026

मध्य रेल्वेच्यावतीने ‘सेवा संकल्प ठराव’

March 5, 2026

‘जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0716006

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697