Sunday, June 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकरी कन्येची संघर्षगाथा; पूनम सुर्वे यांची पीएसआय पदावर निवड

तरुण भारतbyतरुण भारत
March 8, 2026
in education
0
शेतकरी कन्येची संघर्षगाथा; पूनम सुर्वे यांची पीएसआय पदावर निवड
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर बैरागवाडी मोडनिंब (ता. माढा)  येथील शेतकरी कन्या पूनम किसन सुर्वे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे मोडनिंब परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पूनम सुर्वे यांचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयात झाले.

या विद्यालयाच्या शिस्तबद्ध व संघर्षशील वातावरणामुळे त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण शेटफळ येथे पूर्ण केले.अकरावी-बारावीत असतानाच एमपीएससीद्वारे अधिकारी होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी बी.ए. शाखेत प्रवेश घेतला आणि पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. दररोज सातत्याने १० ते १२ तास अभ्यास करून त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. सातत्याने अभ्यास करणे हे मोठे आव्हान असतानाही त्यांनी अनेक अडचणींवर मात करत तयारी सुरू ठेवली.

५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेत त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत मुख्य परीक्षेची तयारी अधिक जोमाने केली. त्यानंतर कठोर मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पार करत त्यांनी मुलाखतीचा टप्पा गाठला. अखेर ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या मुलाखतीतही उत्तम गुण मिळवत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद पटकावले.पूनम सुर्वे यांच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

Post Views: 52
Previous Post

मालगोंडा हॉस्पिटलमध्ये पोटाच्या कॅन्सरवर यशस्वी उपचार

Next Post

राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी डॉ.संजयकुमार गायकवाड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी डॉ.संजयकुमार गायकवाड

राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी डॉ.संजयकुमार गायकवाड

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896598

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697