अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात शुक्रवारी संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा संपन्न झाली.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पुरोहित सोमकांत कुलकर्णी, आप्पा हंचाटे, प्रवीण घाटगे, अतिष पवार, सुमित कल्याणी, शुभम सावंत, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, बाळासाहेब घाडगे, बसवराज क्यार, समर्थ चव्हाण, मडोळप्पा बदोले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
























