सोलापूर – महिला दिन आणि रंगपंचमीचे औचित्य साधत हरिपाठ परिवाराच्या वतीने “अवघा रंग एक झाला” या संकल्पनेतून महिलांसाठी विशेष रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती गोल रिंगण करून नामघोषाच्या गजरात रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.या उपक्रमात एकूण ५० महिला आणि २५ मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा सन्मान करण्यात आला. मात्र यावर्षी विशेष उपक्रम म्हणून हरिपाठ परिवाराची ओळखपत्रे मोफत वाटप करून महिलांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन अंजली लोखंडे, गीता क्षीरसागर, वर्षा गोसावी आणि अश्विनी जांभळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन बळीराम जांभळे महाराज यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिपाठ परिवार, श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था तसेच श्री दत्त गणेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

















