Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“ती – आत्मविश्वासाची ज्योत” : हिराचंद नेमचंद महाविद्यालयात महिला दिन उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
March 10, 2026
in editor
0
“ती – आत्मविश्वासाची ज्योत” : हिराचंद नेमचंद महाविद्यालयात महिला दिन उत्साहात
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथे व्यवस्थापन विभाग आणि ‘हिरकणी  महिला सक्षमीकरण केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “ती आत्मविश्वासाची ज्योत” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि उद्योजकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी स्वागतपर भाषणात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक युगात महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रीतम कोठारी यांनी मांडली. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. गायत्री लिगाडे आणि प्रा. गायत्री बेनगिरी यांनी करून दिला. ‘हिरकणी’ महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅचरोपथी सल्लागार डॉ. सोनाली घोंगडे उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत संतुलित आहार, नियमित व्यायाम, नैसर्गिक उपचारपद्धती आणि सकारात्मक जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ‘फार्मसीड्स अ‍ॅग्रो’, सोलापूरच्या संस्थापक सौ. सविता जुजगार उपस्थित होत्या. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी उद्योजकतेतील स्वतःचा प्रवास सांगत महिलांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी नव्या संधींचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सौ. जुजगार यांच्या ‘फार्मसीड्स अ‍ॅग्रो’ या व्यवसायावरील माहितीपर डॉक्युमेंटरी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “उदयोन्मुख महिला उद्योजक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तन्वी मंथळ व कु. संजना मशाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रजनी क्षीरसागर यांनी केले. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.

Post Views: 21
Previous Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीसाठी मुंडे करणार उपोषण

Next Post

कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा

कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा

ताज्या बातम्या

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

श्री जिन संस्कार शिबिर आणि मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा उत्साहात

April 27, 2026
मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

मातृभाषेच्या अभिमानाबरोबरच इंग्रजी भाषा कौशल्य आत्मसात करा – सचिन उकिरडे

April 27, 2026
नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

नेल्सन मंडेला इंटरनेशनल पीस पुरस्काराने मोहम्मद अयाज सन्मानित

April 27, 2026
सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

सुरेल ऑर्केस्ट्राने बार्शीकरांनी धरला ठेका

April 27, 2026
धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

धीरेंद्र शास्त्रीच्या प्रतिमेस सोलापूरात शेनाचा अभिषेक

April 27, 2026
खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

खेडभाळवणी येथे ‘एकता महिला मंच’चा भव्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

April 27, 2026
कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

कॉमेडीचा ओव्हरडोस देणाऱ्या ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच

April 27, 2026
पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

पं.स.च्या कार्यालयात एकाच वेळी आमदार व सभापतींच्या दोन वेगवेगळ्या बैठका

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0832724

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697