मोहोळ – पेनूर (ता. मोहोळ)येथे कै. सुशिला आजाजी माने व कै. आबाजी सिंधु माने यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल खुली क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन सोमवार दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वा . करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक सोलापूर शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त, राजन आबाजी माने यांच्यातर्फे ६१ हजार रुपये,द्वितीय पारितोषिक नक्षत्र लॉन्सचे मालक समाधान माने,मोहोळ विधानसभा प्रमुख रणजित चवरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तेजस बोबडे यांच्याकडुन ३१ हजार,तृतीय पारितोषिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व युवा उद्योजक विकी शेठ सलगर यांच्याकडून २१ हजार,चतुर्थ पारितोषिक महराष्ट्र पोलीस नितीन चवरे,विनायक क्षीरसागर यांच्याकडून ११ हजार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंनाही सन्मानित करण्यात येणार असून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय काही वैयक्तिक बक्षिसांचीही तरतूद आयोजकांनी केली आहे.स्पर्धेसाठी प्रवेश फी ५५५५ रुपये ठेवण्यात आली आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख १६ मार्च २०२६ असून २१ मार्च रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले असून खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले असून स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या स्पर्धेचे आयोजन कै.सुशील माने व आबाजी सिद्धू माने यांचे भाचे संतोष चवरे व संग्राम डोंगरे यांनी केले असून या क्रिकेट स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रीडांगण पेनूर येथे भरविण्यात येणार आहेत.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सामना समितीचे संग्राम डोंगरे मो. 9970763321,नितीन चवरे मो. 9860001422,अंकुश चव्हाण मो. 9096941091,राजेश माने मो. 9503093737 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

























