मोहोळ – येथील आदर्श गणेशोत्सव मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आलेल्या या उत्सवाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दि.२५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या थाट्या-माठ्यात करण्यात आली .
या मिरवणुकीमध्ये लेझीम महिलांचे नृत्य व वारकरी यांचे भजन व तुकाराम मुंढे अन्न औषध प्रशासन आयुक्त यांची डिजिटल फलक लावून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक संस्थापक दत्तात्रय पुराणिक सुधीर तोगरे रशीद पठाण नंदू विभुते कालिदास शेटे गणेश धोत्रे राजू घोंगडे प्रमोद कोरे व इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक निघाली मंडळातील ज्येष्ठ व तरुणांच्या सहकार्याने सहकार्याने ही मिरवणूक पार पडली.
चौकट
गणपती उत्सवामध्ये श्रींच्या आरतीसाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी लकी ड्रॉ चे नियोजन करण्यात आले होते या लकी ड्रॉ मध्ये
मंडळाच्या वतीने पैठणी साडी, नागेश कोरे यांच्याकडून पैठणी साडी,गणेश धोत्रे यांच्याकडून दोन ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण आणि किरण स्वामी यांच्याकडून कप अशी ४ बक्षीसे देण्यात आली. उर्वरित शहरात त्या त्या मंडळांनी आपापल्या सोयीने ट्रॅक्टर मध्ये छोट्या मिरवणूका काढल्या.एकंदरीत गणेशोत्सव शांततेत पार पडला .
Post Views: 14