सोलापूर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दयानंद कॉलेज स्टुडन्ट सर्कलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य जयंती मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दयानंद कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 2026 – 27 सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यशपाल वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
दरवर्षी दयानंद कॉलेज स्टुडन्ट सर्कलच्या वतीने वर्षभरात दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या वेळी दयानंद कॉलेज स्टूडेंट सर्कल पुढाकार घेऊन मदत करत असते.या बैठकीत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवड झालेले सत्यजित वाघमोडे यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी नेते अतिश बनसोडे, ॲड.अखिल शाक्य, सागर शितोळे, सुजित खुर्द, रुपेश तडसरे, अभि शिंगे, सुनील मस्के, अनिकेत गायकवाड, सोनू गजधाने, विजय माने यांच्यासह दयानंद महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.बैठकीत 2026-27 सालासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी प्रविण दलशिंगे, राज गायकवाड, अनिकेत येरवडे, सुयश गायकवाड आणि प्रदीप कांबळे यांची निवड करण्यात आली.सचिवपदी अनिकेत बनसोडे तर सहसचिवपदी रितेश भोसले यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून ओंकार वडतिले, खजिनदार म्हणून दियेश सावंत यांची निवड करण्यात आली.मिरवणूक प्रमुख म्हणून आदित्य कांबळे, अवि गायकवाड, सिद्धू काळे, रियाज बेग, आदित्य लोणारी, सिद्धार्थ बनसोडे, सुंदर उबाळे आणि रॉक मुरुमकर यांची निवड करण्यात आली. तर प्रमुख सल्लागार म्हणून ॲड.आनंद कांबळे, सुनील मस्के आणि अनिकेत गायकवाड यांची निवड करण्यात आली.

























