सोलापूर : दाजी पेठ येथील आप्पा गणपती प्रतिष्ठान या मंडळास राज्य शासनाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक, सांस्कृतिक तसेच जनजागृतीपर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा नियोजन कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक मेघनाथ येमूल, सचिव विवेकानंद महिंद्रकर, आप्पा गणपती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश कोडम, हरीनिवास सोमा, अनिल व्हनमाने आणि लक्ष्मीकांत महिंद्रकर उपस्थित होते.
आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांची दखल घेत राज्य शासनाकडून मिळालेला हा सन्मान दाजी पेठ परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. मंडळाच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
























