धाराशिव – शहरातील ग्रीनलँड शाळेचे बांधकाम आणि प्लास्टर आदी काम केले आहे. मात्र काम करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील ठरलेली मजुरी दिलेली नाही. ही मजुरीचे रक्कम थोडी थोडकी नव्हे तर १ लाख ६० हजार रुपये बाकी आहे. त्यामुळे माझ्या कष्टाची रक्कम वसूल करून द्यावी अशी मागणी मजूर कामगार रमजान वजीर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दि.११ मार्च रोजी केली आहे. दरम्यान मजुरी रक्कम वसूल करून न दिल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील तुळजापूर रोड लगत असलेल्या ग्रीनलँड शाळेच्या चौथ्या मजल्याचे आऊटर चे काम पश्चिमेकडील बांधकाम व पूर्वेकडील चार इंच तीन फूट बांधकाम करण्याचे १ लाख ६० हजार रुपये मजुरी ठरली होती. तसेच काम संपत आले असता चौथ्या मजल्याच्या आतील पूर्ण बांधकाम पाचव्या मजल्याचे पॅराफिट बॉल, टॉवरचे बांधकाम प्लास्टर व टॉवरवर पाण्याचा हौद त्याचे बांधकाम प्लास्टर व पूर्ण बिल्डिंगचे आऊटरचे प्लास्टर हे सर्व काम मटेरियल चढवून करण्यासाठी ११ लाख रुपये ठरले होते.
ठरल्याप्रमाणे वरील दोन्ही कामे पूर्ण केली असून त्या दोन्ही कामाची मजुरी १२ लाख ६० हजार रुपये झाली आहे. मात्र, डॉ टी.वाय. स्वामी (मो. नं. ९०२१४६८००३) यांनी रमजान शेख यांना त्यापैकी फक्त ११ लाख रुपये वेळोवेळी दिलेले आहेत. तर उर्वरित १ लाख ६० हजार रुपये रक्कम बाकी राहिलेली आहे. राहिलेली रक्कम द्यावी यासाठी हे स्वामी यांच्याकडे वारंवार मागणी करीत आहेत. मात्र स्वामी या ती रक्कम देण्यास टाळा टाळ करीत असून मला रक्कम मागायची नाही असे सांगितले आहे. तसेच त्या शेख यांचा फोन उचलत देखील नाहीत. याबाबत पोलीस अधीक्षक, कामगार कल्याण अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार अर्ज करून पाठपुरावा केला मात्र अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे मागील दोन महिन्यापासून यांना मानसिक त्रास होत आहे.
विशेष म्हणजे शेख यांनी केलेल्या कामाची चौकशी व त्या कामाचे मोजमाप करून बिल्ट प्रमाणे मजुरी स्वामी यांच्याकडून वसूल करून देण्यात यावी. त्यामुळे ती रक्कम येत्या पंधरा दिवसात द्यावी. अन्यथा शेख हे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा ग्रीनलँड शाळेसमोर दि.२६ मार्चपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.


























