Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासन प्रशासन एकत्र काम केल्यास कामे गतिमान : आमदार सुभाष देशमुख

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
शासन प्रशासन एकत्र काम केल्यास कामे गतिमान : आमदार सुभाष देशमुख
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून जर हातात हात घालून काम केले तर निश्चितच कामकाज गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. ते होटगी येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

।याप्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील, पंचप्पा धनशेट्टी, बलवान गोतसुर्वे, बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नायब तहसीलदार विनायक कुलकर्णी, नायब तहसीलदार रुपाली करमाळकर आदी उपस्थित होते.

     छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरासाठी प्रशासकीय अधिकारी शासनाच्या आदेशानुसार आपले कार्यालय सोडून ते आपल्या चेहऱ्यावरील काम पूर्ण झाल्याचा आनंद पाहण्यासाठी सर्व यंत्रणेसह आपल्या गावात आले आहेत. तेव्हा या शिबिरातून एकही नागरिक नाराज होऊन रिकाम्या हाती जाणार नसल्याची ग्वाही तहसीलदार किरण जमदाडे यांनी यावेळी दिली.

       कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शिबिराच्या ठिकाणी सेतू कार्यालयातील सेवा ,आधार कार्ड , शिधापत्रिका, जातीचे दाखले, शैक्षणिक दाखले, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, सातबारा दुरुस्ती आदी विविध सेवा एका छताखाली देण्यात आल्या. कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू चे परवाने, अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना बेबी किट्स, कृषी विभागाकडून ट्रॅक्टर प्रमाणपत्र आदि विविध दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शाळा परिसरात आमदार सुभाष देशमुख व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शिबिरासाठी महसूल विभाग ग्रामपंचायत यांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती, नागरिकांसाठी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सुविधा कक्षाद्वारे  तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांनी प्रत्येक नागरिकांना अर्ज भरून देणे, विविध दाखले देणे, मार्गदर्शन केल्याने नागरिकांना शिबिराचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडल अधिकारी प्रतिभा घुगे, रियाज भाईजान, संतोष फुलारी, ग्राम महसूल अधिकारी शेखर शेड्याळ, सचिन सावळे,अजय राठोड, वामन जाधव, ग्रामसेवक सुरेश कोळी, पोलीस पाटील रेणुका इंगळे, कोतवाल मल्लू कोळी, सोनाली चिवडशेट्टी, अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत लांडगे तर असीम शेख यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास होटगी मंडलातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…

चौकट

…

अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ.

————

1.पुरवठा व सेतु विभाग- 698

2.घरकुल वाळू वाटप- 87

3.विविध दाखले, प्रमाणपत्रे व आधारकार्ड- 393

4.निराधार योजना व निवडणूक – 162

5.7/12 व खाते उतारा वितरण- 409

6.आरोग्य विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग,  ग्रामविकास विभाग,  पशुवैद्यकीय विभाग, महापारेषण विभाग – 319

7. AgriStack नोंदणी मंजूरी- 661

Post Views: 15
Previous Post

लखन-सर्जा बैलजोडी गाडीने सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला

Next Post

हॉटेल व्यवसायिकांना बसते गॅसची झळ ! 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हॉटेल व्यवसायिकांना बसते गॅसची झळ ! 

हॉटेल व्यवसायिकांना बसते गॅसची झळ ! 

ताज्या बातम्या

15 March 2026

March 15, 2026
महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

March 15, 2026
सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

March 15, 2026
नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

March 15, 2026
नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

March 15, 2026
हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

March 15, 2026
महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

March 15, 2026
पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0735304

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697