वळसंग – येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत टाटा बिल्डिंग इंडिया यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी “आत्मनिर्भर भारत” या विषयावर निबंध स्पर्धा (School Essay Competition) आयोजित करण्यात आली होती.सदर निबंध स्पर्धा ही लहान गट (इयत्ता पाचवी ते आठवी) व मोठा गट (इयत्ता नववी व अकरावी) अशा दोन गटांत घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत प्रशालेतील बहुतांश विद्यार्थी सहभागी झाले होते.
लहान गटातून साक्षी मलिकार्जुन भैरामडगी (८ वीअ), संस्कृती मल्लिकार्जुन हंजगे(६वीअ), झीनत अन्वरपाशा तडमूड (८वीअ)ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले तर मोठ्या गटातून श्रेया बाबुराव फुलारी(९वीअ), काजल संगप्पा माळी(११वी) व साईगंधा तानाजी जमादार(९वीअ) ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.
सदर यशस्वी विद्यार्थिनींना टाटा बिल्डिंग इंडिया यांच्यातर्फे अनुक्रमे गोल्ड मेडल,सिल्वर मेडल व ब्राँझ मेडल तसेच आकर्षक प्रमाणपत्र देऊन प्राचार्य वीरेश थळंगे , टाटा बिल्डिंग इंडियाचे ऑपरेशन एक्झिकेटिव्ह स्वप्निल राजेंद्र माशाळ व वरिष्ठ लिपिका राजश्री दुधगी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर परीक्षेचे परीक्षक म्हणून बसवराज दुधगी व प्रा.संतोष शिंदे यांनी काम केले. प्राचार्य वीरेश थळंगे यांच्यासह परीक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना टाटा बिल्डिंग इंडिया तर्फे मोबाईल स्टॅन्ड देऊन गौरविण्यात आले.
सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी श्रीमंत भोसले, तानाजी जमादार, सिध्दाराम भैरामडगी, निलकंठ कवटगी,वीरेश थळंगे,विजय प्याटी, मल्लिनाथ गौडगाव,विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी यांचे सहकार्य लाभले.
























