बार्शी – तालुका पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी सौ. मीनाक्षीताई रोंगे यांची तर नूतन उपसभापतीपदी संतोषदादा निंबाळकर यांची नुकतीच निवड झाली. त्याबद्दल बार्शी तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुरेश व्हळे, माजी अध्यक्ष रावसाहेब जाधवर, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल कोरेकर, जिल्हा सोसायटीचे चेअरमन आबासाहेब जाधवर, आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष धनाजी कुंभार, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल काळे, जिल्हा सोसायटीचे सचिव दिनेश शिंदे, राहुल ढाकणे, अंकुश घोळवे, सतीश राऊत, अरुण शिंदे ,पंचायत समिती बार्शी येथील सिनियर क्लार्क सौ.सरस्वती सोनवणे उपस्थित होत्या.

























