बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे गुरुवारी ग्लोबल टीचर प्राईझ विनर डॉ. रणजितसिंह डिसले यांच्या ‘शालेय शिक्षणात AI चा वापर जबाबदारीने आणि सुरक्षितपणे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक गुंड सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ गुंड सर यांनी प्रास्ताविक करुन झाली. प्रास्ताविकात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षणात कसा आवश्यक आहे याविषयीची माहिती सांगितली. तसेच डॉ डिसले यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच होईल, असे सांगितले.
आपल्या व्याख्यानात डॉ रणजितसिंह डिसले यांनी शालेय शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित माहिती कृतीसत्र स्वरुपात सादर केली. त्यांनी माहिती सुरक्षा तसेच AI चा वापर करताना जबाबदारीची जाणीव या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच AI चा वापर अध्ययन अध्यापन करताना तो करावा की नाही, काय योग्य आहे अयोग्य आहे.
याविषयीची कृती विद्यार्थ्यांकडून करुन घेतली. त्यांनी AI च्या विविध साधनांची माहिती दिली. गट कार्याद्वारे त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना आपली जबाबदारी कोणती आहे याचीही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. डॉ. डिसले जे सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा डी.एड.च्या विद्यार्थ्यांना झाला.
प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी त्यांचा परिचय करुन दिला व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल असे देखील सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार तसेच नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा गायकवाड जे. पी. यांनी केले.























