सोलापूर – थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेता अमोल शिंदे व माजी सभापती मनपा शिक्षण मंडळ संकेत पिसे यांच्यावतीने पवित्र रमजान महिना निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सन २००७ साला पासून तत्कालीन पोलीस आयुक्त स्व. अशोक कामठे यांच्या उपस्थितीत थोरला मंगळवेढा तालीम हे महाराष्ट्रातले पहिले गणेशोत्सव मंडळ ठरतेय, त्यामध्ये रोजा इफ्तार पार्टीचे कार्यक्रम घेण्यात आले होते, व सन २०२६ रोजी ही रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन हे निरंतर आहे. सोलापूर शहर पोलीस उपआयुक्त गौहर हसन व उपायुक्त विजय कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक तोफिक हत्तुरे, नगरसेवक चेतन नरोटे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, राजू कुरेशी, राजू हुंडेकरी, नगरसेवक अझर हुंडेकरी, माजी नगरसेवक रियाज खरादी, करीम लोखंडवाला, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, युवा नेते सागर पिसे, सोहेल कुरेशी, समीर शेख, प्रसाद कुमठेकर वाहिद विजापुरे, समीर लोंढे, जावेद वाडर, इब्राहिम शेख, इम्तियाज कमिशनर, गफूर शेख, अल्फरान आबादीराजे आदी उपस्थित होते.
























