सोलापूर – नदीमध्ये पाणी नसल्यामुळे व मोटार जळाल्याने महिनाभर पाणी न सोडणार्या मंद्रूप ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येते. एकीकडे गावात पाणीटंचाई असल्यामुळे आठवड्याला एखदा पाणी सोडण्यात येत आहे, तर दुसरीकडे वालमधुन हजारो लिटर पाणी वाया जात असताना त्याकडे दुर्लक्ष करून नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
म
ंद्रूप निंबर्गी रस्त्यावरील नटराज हाॅटेलसमोर असणाऱ्या वालमधून हजारो लिटर पाणी वाया जात असताना मंद्रूप ग्रामपंचायतकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामपंचायत सदस्य व कर्मचार्यांना कल्पना देऊन ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
मंद्रूप येथील निंबर्गी रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल नटराज समोर इंदिरानगरसाठी जाणाऱ्या जलवाहीनीवर वाल बसवण्यात आला आहे . या वालमधून मंगळवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून आले. याबाबत येथील व्यावसायिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला अनेक वेळा कळविल्यानंतरही कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वालच्या पाण्याबाबत मंद्रूप ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांच्याकडे विचारण्यास करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे नेमके कारण काय? याबाबत कळू शकले नाही.
….
























