सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व उपाध्यक्ष महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड उपस्थित होते.
९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या ७४, गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या १२ विद्यार्थ्यांना रोख १ हजार रुपये तसेच पदविका अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील शुभम माने, यशराज देशमुख, ऋषिकेश शेंडगे आणि स्वप्नाली दिवसे द्वितीय वर्षातील मृदुला पाटील, अमृता मिसाळ, नेहा लेंडवे प्रथम वर्षाच्या सबा इनामदार, आरती गंगाधरे, आदित्य खटकाळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबुराव गायकवाड, महादेव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख, सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


























