श्रीपूर – गुढीपाडण्याचे औचित्य साधत डॉ .आंबेडकर स्मारक समोर पूर्वी तयार करण्यात आलेल्या बस स्थानका समोरच एस .टी बस थांबा सुरू करण्यात आला आहे . पूर्वी बृहन्महाराष्ट्र शुगर कारखान्याचे मालक कै . चंद्रशेखर आगाशे यांनी बस स्थानका साठी जागा दिली होती . ती त्यांनी आजू बाजूस झालेल्या अतिक्रमणामुळे परत घेतली होती . त्यावेळे पासून श्रीपूरला एस . टी बसस्थानक नव्हते .
बसस्थानक नसल्याने एस . टी . बस छत्रपति चौकात कोठेही थांबत असत . त्यामुळे उन्हातान्हात थांबून प्रवाशांची धावपळही होत असे . खरे तर श्रीपूर हे गांव येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारकपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना व ब्रिमा सागर डिस्टलरी या उद्योगामुळे व मोठी नागरीवसहत म्हणून ओळखले जाते तसेच बाजारपेठे मुळे अनेक गावांसाठी मध्यवर्ती ठीकाण आहे . असे असताना साधे एस . बस स्थानकही नव्हते . याला महत्वाचे कारण म्हणजे जागा नाही हे होते .
यावर ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून प्रदीप मदाल , कै विठ्ठल देशमुख , हेमंत दिक्षित ,डॉ . सुनिल फडे , तुकाराम केसकर यांनी त्यावेळचे पदवीधर मतदार संघातून निवडून ओलेले आ . प्रकाश जावडेकर यांना या प्रश्नाची तिव्रता सांगून एस . टी . बस स्थानकाची मागणी केली होती . यावर आ . प्रकाश जावडेकर यांनी तातडीने निधी मंजूर करून सध्याचे डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात बस स्थानक बांधून दिले . मात्र स्थानक झाल्या पासून या ठीकाणी एकदाही एस . टी . बस थांबली नाही .
या नंतर महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेव नानासाहेब मुंडकणे व रतनसिंह यांचे पुढाकाराने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहोते पाटील यांनीही छत्रपति शिवाजी महाराज चौकात एस . टी . बसस्थानक बांधून दिले या ठीकाणीही एस . टी . बस थांबत नाहीत . या पार्श्वभूमीवर महाळुंग – श्रीपूर नगर पंचायतीचे सदस्य प्रा . प्रकाश नवगिरे यांनी ही बाब अकलूजचे स्थावर व्यवस्थापक प्रमोद शिन्दे यांच्या निदर्शनास आणून देत श्रीपूरला दोन बस स्थानके असून त्या ठीकाणीच बसेस थांबविणेत याव्यात या बाबत निवेदन दिले .
प्रत्यक्ष परिस्थिती व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी गुरुवार दि . १९ मार्च (गुढीपाडवा ) पासून या अधिकृत बस स्थानका समोर बस थांबदिणेच्या सुचना चालक व वाहक यांना दिल्याने आज दुपारी ११ वा . अकलूज माळखांबी ही बस बस थांब्यावर थांबविणेत आली . यामुळे छत्रपति चौकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे . प्रवाशांची चांगली सोय होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे . बसस्थानक थांबा येथे आली एसटी चे स्वागत व वाहक बिराजदार मॅडम चालक आबा गोसावी यांचा सन्मान प्रकाश नवगिरे यांचे हस्ते करण्यात आला .
यावेळी डॉ . सुहास बनसोडे माजी वाहन निरीक्षक अनिल दळवी , विष्णु माने , माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे , एसटी चे माजी कर्मचारी अशोक गाडे, प्रकाश खंडागळे , पांडुरंग चव्हाण, आनंद ताकतोडे ,भीमराव भाग्यवंत, सदा पवार, औदुंबर यादव, जयंत भोसले, ज्ञानेश्वर काटे , गुडुलाल शेख, व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मार्गावर असलेल पंढरपूर बोरगाव जांबूड माळखांबी नेवरे या एसटी बसेस येथे थांबणार आहेत सदर बसस्थानक रंगरंगोटी अक्षर पेंटिंग नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी स्वखर्चाने केले आहे यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले तर आभार विष्णू माने यांनी मानले .


























