सोलापूर – दिनांक 16 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,शाखा जुळे सोलापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले महिला दिनाच्या औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे उपस्थित होत्या व त्यांच्या हस्ते आज महिला दिनानिमित्त हरिपाठ व मनाचे श्लोक हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
सूत्रसंचालन भरले यांनी केले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिला ठेवीदार यांनी आपल्या आपल्या आयुष्यात आलेले प्रत्येक अनुभव व यशाचे शिखरे गाठतानाचे अनमोल विचार व्यक्त केले ,तसेच सलगरे मॅडम यांनी कविता वाचल्या, या कार्यक्रमास अगदी रंग भरून देणारे घोडके मॅडम यांनी स्वतःच्या जीवनाची संघर्ष कथा सांगितली महिलांचे डोळे पाणावलेले त्यांनी सांगितलेले प्रत्येक संघर्ष करता त्याला सामोरे जाताना आलेले अनेक अडचणींना मात करून यश गाठले व तसेच त्याने सामाजिक कार्य यशस्वी रीतीने पार पाडले .
आपल्या शाखेचे सल्लागार रेडेकर मॅडम यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे मॅडम यांच्या वरती कविता मांडले सर्वांना खूप आवडलेली ती कविता. तसेच कोल्हापूरचे मॅडम यांनी प्रत्येक भूमिका आयुष्यातील समतोल सामान्यता व सायोज मुक्ती यावर कथन केले तसेच महिलांनी स्वावलंबी राहणे यावर आपले विचार देवाण-घेवाण केले .
हजारे मॅडम यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा तसेच प्रत्येक महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व आयुष्याचे प्रत्येक क्षण हे हसतमुखाने सामोरे जाणे व आपला मार्गदर्शन सर्वांना केले कार्यक्रम अतिशय एकदम सुंदर रित्या रंगलेले व सरते शेवटी सर्व महिलांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीत एकत्र म्हणून कार्यक्रमास रंग भरले कार्यक्रम अतिशय मंगलमय वातावरणात पार पडले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . जुळे सोलापूर शाखेचे विस्तार अधिकारी पवार सर व शाखा अधिकारी भरले मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.


























