पंढरपूर – येथील ‘स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसीचे १७ आणि डी.फार्मसीचे १२ अशा तब्बल २९ विद्यार्थ्यांची गुजरात येथील आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या ‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनीत कॅम्पस इंटरव्यूव्हद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी दिली.
‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे मॅनेजर आणि त्यांच्या निवड समितीने स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या इंटरव्यूव्हमधून डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या एकूण २९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
निवड समितीच्या अंतिम प्रकियेतून फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे वैष्णवी मनोज देवरडे, काजल रणजित भोसले, आदित्य राजेंद्र बोडके, प्रियांका सुभाष मोकळे, प्रचिती वसंत काटकर, आरती बजरंग मेटकरी, सुमेध औदुंबर वाघमारे, सोमनाथ आबा गावंधरे, संदीप दत्तात्रय काळे, मयूर बाबासाहेब फंड, समीर चंद्रकांत शिंदे, रोहित काळाप्पा माळी, आदित्य नामदेव खुळे, आदर्श अंकुश चव्हाण, रुजुल शरद भोसले, हरी संजय खोत व अंकिता बापू लेंगरे आणि डी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे गणेश अनिल ढोणे, विनोद हणमंत बंडगर, आर्यन ज्ञानेश्वर शेळके, महेश राजेंद्र नाईकनवरे, श्रीकांत दुंडप्पा नरुटे, सतीश सिद्धराम कोळी, आदित्य बाबासाहेब भंडारे, निखिल नंदकुमार पवार, प्रमोद चंद्रकांत काळे, आदेश हणमंत पारसे, समाधान सुरेश नरळे व अमेय दिनेश जाधव या २९ विद्यार्थ्यांची ‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ या कंपनीत ‘क्वालिटी कंट्रोल आणि प्रॉडक्शन’ या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या २९ विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी अभिनंदन केले.
—————-
कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी सांगितले की, ‘विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्याचा उद्देश, त्यांना उत्तम करिअर संधी उपलब्ध करून देणे आहे. त्याचबरोबर स्वेरीतील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात आणखी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन सातत्याने केले जाईल.’






















