सोलापूर – विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विधान परिषदेत मला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला, हे माझे मोठे भाग्य आहे. २००३ साली प्रथम संधी, त्यानंतर राज्यसभेतील कार्यकाळ आणि २०२० पासून विधान परिषदेत आमदार म्हणून काम करताना अनेक अनुभव, शिकण्याच्या संधी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आला.
या प्रवासात साथ देणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांचे मनःपूर्वक आभार. विशेषतः फडणवीस साहेबांनी सातत्याने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. भाजपमध्ये प्रवेशानंतर दिलेली संधी ही माझ्यासाठी नवी जबाबदारी आणि प्रेरणा ठरली त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी ऋणी आहे.
स्व. वसंतदादा पाटील, आदरणीय शरद पवार साहेब, जयंतराव टिळक, शेकापचे जयंतराव पाटील, नितीन गडकरी साहेब, रामराजे निंबाळकर, सभापती राम शिंदे यांच्यासारख्या अनेक मान्यवर, अभ्यासू नेत्यांचे मार्गदर्शन या सभागृहाला लाभले आहे. या वरिष्ठ सभागृहाने राज्याच्या कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्राला दिशा देणारी धोरणे घडवली, अनेक योजना राबवल्या आणि जनसामान्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अशा या समृद्ध परंपरा लाभलेल्या सभागृहात आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, याचे समाधान आणि अभिमान दोन्ही मनात आहेत.
या सभागृहाची समृद्ध परंपरा, अभ्यासू आणि अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे येथे काम करताना प्रत्येक क्षणी काहीतरी शिकायला मिळाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सभापती श्रीमती नीलम गोऱ्हे ताई यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.
पुढील काळातही जनतेच्या सेवेसाठी तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत राहीन, हीच ग्वाही देतो.
पुनश्च एकदा भाजपा परिवाराचे, तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसह सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
#विधान_परिषद
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन
#निरोप_समारंभ
#आमदार_रणजितसिंह_मोहिते_पाटील

























