सोलापूर – महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीची प्रक्रिया आज शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील वकील बांधवांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये चांगल्या प्रतिसादासह मतदान झाले.
मिळालेली अधिकृत आकडेवारी अशी की, बार्शी येथे 550 पैकी 372, मोहोळ येथे 195 पैकी 126, माढा येथे 385 पैकी 248, पंढरपूर येथे 750 पैकी 553, माळशिरस येथे 545 पैकी 361, सांगोला येथे 288 पैकी 212, मंगळवेढा येथे 179 पैकी 118, अक्कलकोट येथे 76 पैकी 44, करमाळा येथे 208 पैकी 140, तर सोलापूर येथे 2445 पैकी 1595 वकीलांनी मतदान केले.
एकूणच, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मतदानाच्या टक्केवारीवरून यंदा वकील वर्गामध्ये निवडणुकीबाबत विशेष उत्सुकता आणि जागरूकता दिसून आली.


























