पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 163 जणानी रक्तदान केले. तर 400 पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 700 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळेस दहा हजार आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पिलीव येथे स्व.ज्ञानेश्वर भाऊ पडळकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपचे नेते सचिन पडळकर यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल तसेच पिलीव भाजपा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिलीव येथे आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये नागरिकांनी अतिशय उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला .या शिबिराचे उद्घाटन पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे जिल्ह्य परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या नम्रता पुकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेस सचिन पडळकर, उमेशभाऊ सरवदे,, भजनदास चोरमले, शिवराज पुकळे ,संजय पाटील, गणेश देशमुख, अतुल नष्टे, नितीन कपने, सचिन भैस, निशांत बगाडे, प्रवीण वाघमारे, योगेश देशमुख, अंकुश भैस, फिरोज शेख, निलेश कांबळे, संकेत देशमुख, दामोदर लोखंडे, निसार मुलाणी, फिरोज शेख, यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, बचेरी, सुळेवाडी, शिंगोर्णी, काळमवाडी या भागातील अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिलीव येथे रक्तदान शिबीराप्रसंगी जि प सदस्य चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सदस्य नम्रता पूकळे, सचिन पडळकर व इतर मान्यवर.


















