Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुळ कायद्यातील जाचक अटींमुळे शेतकरी हवालदील; १० टक्के रक्कम भरून जमिनी नावावर करा

तरुण भारतbyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
कुळ कायद्यातील जाचक अटींमुळे शेतकरी हवालदील; १० टक्के रक्कम भरून जमिनी नावावर करा
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – राज्य सरकारने कुळ कायद्यात सुधारणा करताना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढून ते राज्य सरकारकडे घेणे आणि प्रक्रियेत होणारा विलंब यांमुळे सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असल्याची टीका आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत केली. उजनी धरण परिसरातील ६०० हेक्टरहून अधिक जमीन आणि रांजणी, विमाननगर सारख्या वस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १० टक्के रक्कम भरून घेऊन या जमिनी ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

विधेयकावरील चर्चेत सहभाग घेताना आमदार पाटील म्हणाले की, उजनी धरणासाठी संपादित केलेली मात्र वापरात नसलेली शेकडो हेक्टर जमीन शेतकरी अनेक वर्षांपासून कुळ म्हणून कसत आहेत. ३०-३० वर्षे उलटूनही ही जमीन त्यांच्या मालकीची झालेली नाही. सातबाऱ्यावर ‘कुळ’ असा उल्लेख असल्याने या शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज मिळत नाही, घरांच्या बांधकामासाठी परवानग्या मिळत नाहीत आणि सामाजिक स्तरावरही या मुलांची लग्ने जमण्यात अडचणी येत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. नुकत्याच सरकारकडून आलेल्या नोटिसांमुळे भीतीपोटी दोन शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवताना आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार राज्य सरकारकडे वर्ग केल्यामुळे फाईलींचा प्रवास लांबणार आहे. मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्यात शेतकऱ्यांचा वेळ वाया जाईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे हे अधिकार कायम ठेवले तर स्थानिक पातळीवर प्रश्न लवकर सुटतील. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून जिल्हाधिकाऱ्यांना कालमर्यादा घालून द्यावी, जेणेकरून दोन-तीन महिन्यांत शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी होतील, असा तोडगा त्यांनी सुचवला.

विमाननगर, रांजणी, सुरली आणि शिराळा यांसारख्या गावांमधील घरांचा आणि शेतीचा प्रश्न या कायद्यामुळे सुटू शकतो. ज्या कारणासाठी जमीन घेतली होती, त्यासाठी ती वापरली नसेल तर ती मूळ शेतकऱ्याला परत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. केवळ २-४ एकर जमीन असणाऱ्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने या कायद्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्क द्यावा, अशी विनंती आमदार अभिजीत पाटील यांनी भाषणाच्या शेवटी केली. त्यांच्या या भूमिकेचे उजनी काठच्या शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.

Post Views: 33
Previous Post

ए झा*#ट्या, तुझी एवढी हिंमत..भाजप नगरसेविकेकडून अर्वाच्य शिवीगाळ

Next Post

मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी करा

मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी करा

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958256

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!