पंढरपूर – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा व कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग सिंहगड इंजीनियरिंग कॉलेज कोर्टीरोड पंढरपूर ( जि.सोलापूर ) येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सुनिल जगताप यांची एक मताने निवड करण्यात आली.
अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकाभाई पटेल,प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे,प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, उच्च शिक्षण विभागाचे प्रांताध्यक्ष डॉ.प्रा. प्रदीप खेडकर यांच्या हस्ते सुनिल जगताप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील संघटनात्मक कार्यस शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ.सचिन लादे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. या निमित्ताने आमदार तथा स्वागताध्यक्ष समाधान आवताडे यांच्या हस्ते सुनिल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनुलोमचे पंढरपूर विधानसभा प्रमुख रामेश्वर कोरे उपस्थित होते.

















