माहूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज अचानकपणे माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान गाठून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेत प.पू. महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी श्रींचे दर्शन घेत श्री दत्तप्रभू ,श्री रेणुका माता चरणी “जगात सुख,शांती, समृद्धी नांदू दे!” अशी प्रार्थना केली.
यावेळी श्री दत्त शिखर संस्थान येथे श्याम भारती महाराज यांनी अशोकराव चव्हाण यांचा सत्कार केला, तर श्री रेणुका देवी संस्थान येथे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सत्कार करून मातेचा महाप्रसाद दिला. यावेळी श्री दत्त शिखर संस्थान सह रेणुका माता संस्थान वर सुरू असलेल्या विकास कामांचा खा.चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, उपविभागीय अभियंता डी.के.भिसे यांच्याकडून आढावा घेतला.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव यांचे सोबत माजी आमदार अमरनाथ राजुरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील नागेलीकर, नांदेडच्या महापौर कविताताई मुळे, ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, प्रवीण साले, संजय देशमुख लहानकर, निलेश पावडे, किशोर भवरे,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे.डॉ.निरंजन केशवे, संजय राठोड,अनिल वाघमारे, कांतराव घोडेकर, नगरसेवक गोपू महामुने, हाजी उस्मान खान पठाण, किशोर जगत, विनायक मुसळे,सय्यद रहमत अली, दिलीप मुनगिलवार, रामकिसन केंद्रे, अजय पवार यांचेसह एमआयएमचे युवा नेते इरशाद मकरानी यांनी का.अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी नायब तहसिलदार कैलास जेठे, पोनि देविदास चोपडे, तसेच अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















