मुदखेड – मौजे राजवाडी गावातील स्वस्त धान्य दुकानदार व्यवस्थित राशन गोरगरीब दिव्यांग बांधवांना वाटप नसल्याची तक्रार दिव्यांग बांधव व गावकऱ्यांनी केली आहे.
दिव्यांग व गोरगरीबांच्या ओ. टी.पी. घेऊन त्यांना राशन धान्य व्यवस्थित वाटप करत नाहीत व प्रत्येक वेळी लाभधारकांना २/३ किलो राशन कमी देतात राशन वाहतुक म्हणुन प्रत्येकाकडुन २० रूपये वसुल करतात व ब-याच अंत्योदाय कार्ड लाभाधारकांना व शेतकरी, शेतमजुरांना चालू महिन्याचा सुध्दा माल २/३ किलो प्रमाणे कमी दिला जात आहे व स्वस्त धान्य दुकानदार आपलीच मनमानी कारभार चालवतांना दिसत आहेत. यांना जर धान्य वाटप करायचे नसेल तर गावातील दुस-यांना कोटा द्यावे अन्यथा दर महिन्याचा कोटा व्यवस्थित वाटप करण्यासाठी सुचना करावेत. यापुढे अशी कोणतीही तक्रार गावक-यापर्यंत येउ नये अन्यथा तहसिल कार्यालय मुदखेड येथे उपोषणाचा इशारा दिव्यांग बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. १५ दिवसात कोटा वाटप करणा-यांचा निर्णय निकाली काढावे अशी दिव्यांग बांधवांच्या वतीने विनंती केली आहे.तसेच राजवाडी गावातील राशन वाटपाची व्यवस्था गावात असताना दुकानदारांच्या घरी १ कि.मी अंतरावर दिव्यांग बांधवाना तांडयावर माल घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्रास कमी करावे. व तो पण लाभधारकांना उध्दट अपशब्द वापरत असतात. काही बायकांशी राशन घेण्यासाठी गेलेल्या महिलांना लाईकी व औकात म्हणुन हिनवत आहेत. अशा राशन दुकानदारांस कुठे तरी आळा बसायला पाहीजे.
शासन निर्णय कायद्या २०१६ नुसार कार्यवाही करावी अन्यथा वरिष्ठ पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात यईल तक्रारदारांनी याअगोदरही तक्रार केली होती पण पुरवठा अधिकारी याकडे गांभीर्यान लक्ष दिले नसल्याने दिव्यांग बांधव व गावकरी रस्त्यावर उतरू व उपोषण किंवा आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
वरिष्ठ पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालय राजवाडी येथे येऊन गावक-यांच्या समोर शाहनिशा किंवा सखोलपणे चौकशी
करून दुकानदारावर कारवाई करावी.असे निवेदनात नमुद केले आहे.
















