माहूर : तालुक्यातील सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एचपीव्ही (मानवी पॅपिलोमा व्हायरस) मुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी राबवली जाणारी सरकारी मोहीम असलेल्या तथा २८ फेब्रुवारी २०२६ पासून भारतात सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेची शनिवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम.मोरे यांच्या मार्गदर्शक उपस्थितीत उत्स्फूर्तपणे सुरुवात करण्यात आली.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमधील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून,
किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवणे, हा मुख्य उद्देश असलेल्या एचपीव्ही लसिकरण मोहीमेला तालुक्यातील सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २८ मार्च रोजी सुरुवात करण्यात आली.
यावेळी आरोग्य सहाय्यक पी.एम.राठोड, आरोग्य सहाय्यिका एन.एस.भाले, औषधी निर्माण अधीकारी जाधव,तसेच हेल्थ सुपरवायझर कासार यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित लक्ष्य गट व त्यांच्या पालकांना या एचपीव्ही लसिकरण मोहीमेचे महत्त्व पटवून देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. मोरे यांनी सांगितले कि,या मोहिमेत ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जात आहे.
ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका ९३-१००% टळतो.प्रामुख्याने १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुली या मोहिमेसाठी लक्ष्य गट आहेत.
सध्या सिंगल-डोस (एकच डोस) पद्धत वापरली जात आहे. ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जात असून यु- विन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली जात आहे.ही लस एचपीव्ही संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिल्यास सर्वात जास्त प्रभावी ठरते असे सांगितले.
एचपीव्ही लस का महत्त्वाची आहे? याबाबतीत बोलताना डॉ. मोरे यांनी सांगितले कि, एचपीव्ही विषाणू लैंगिक संबंधांतून पसरतो आणि कालांतराने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुप्तांगांचे वार्ट्स किंवा इतर कर्करोग होऊ शकतो. ही लस या विषाणूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते आणि अकाली मृत्यू टाळण्यास मदत करते,असे नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आव्हान केले.















