Monday, May 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

६६.३३ कोटींच्या वाढीसह महापालिकेच्या १४४९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
६६.३३ कोटींच्या वाढीसह महापालिकेच्या १४४९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर : महापालिका प्रशासनाने पाठविलेल्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्सथायी समितीने ६ कोटी रुपये तर सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकात मोठे फेर बदल करत ६६ कोटी ३३ लाखाची वाढ करण्यात आली आहे. यानुसार आता महापालिकेच्या सन २०२६- २७ या आर्थिक वर्षातील महसुली ९९० कोटी ७६ लाख ३६ हजारासह अनुदान आणि कर्ज व मुन्सिपल बाॅंड असे एकुण १४४९ कोटी ७१ लाख ९३ हजार ४०१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. 

             सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  या सभेत स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर सभागृहनेते नरेंद्र काळे मुख्य सूचना मांडली. विरोधी पक्षातील एमआयएमच्या गटनेत्या वहिदा भंडाले – शेख यांनी उपसूचना मांडली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक प्रा. नरसिंग आसादे यांनीही उपसुचना मांडली. सभागृहात दोन उपसूचना प्राप्त झाल्याने या उपसूचना मर्ज करण्यात आल्या 

 एकापेक्षा अधिक उपसूचना आल्यास त्या मर्ज केल्या जातात. अंदाजपत्रकावर सखोल चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी आपली मते आणि सूचना मांडल्या

           गत अंदाजपत्रकात यंदा महसुली २१७ कोटी ६२ लाख ८० हजार तर एकुण अंदाजपत्रकात १५६ कोटी ४१ लाख ८० हजाराची वाढ करण्यात आली आहे. यंदा महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना समान निधी देण्याचा निर्णय या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला असून प्रत्येक नगरसेवकाला ५० लाख रुपये भांडवली निधी आणि १६ लाख रुपये वार्डवाईज निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याला मान्यता देण्यात आली आहे यामुळे यंदा नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रशासकीय अंदाजपत्रकात ६ कोटी रुपयांची वाढ करत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील तयार केलेले ९३० कोटी ११ लाख ६१ हजार महसुलीसह १३८९ कोटी ७ लाख १८ हजार ४०१ रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे निर्णयासाठी सादर केला होता. या अंदाजपत्रकात कोणत्याही महसूलीसह कर, दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र विकासाच्या दृष्टीने विविध बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

          सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक सादर करताना महापालिका प्रशासनाचे सन २०२५-२६ चे सुधारित अंदाजपत्रक देखील सादर करण्यात आले. सन २०२६- २७ च्या अंदाजपत्रकात महसुली विभागामध्ये महसुली विभाग ८२३ कोटी ९५ लाख ७६ हजार, पाणीपुरवठा १३८ कोटी २९ लाख ६० हजार आणि भांडवलीमध्ये २८ कोटी ५१ लाख आणि आरंभी शिल्लक २ लाख ५७ हजार ४०१ असे ९९० कोटी ७६ लाख ३६ तर खर्चामध्ये महसूल विभाग ६७१ कोटी ४६ लाख ४१ हजार, पाणीपुरवठा १३३ कोटी ३८ लाख ९४ हजार आणि महसुली निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्यासाठी १५७ कोटी ४० लाखासह भांडवली खर्च १८५ कोटी ९२ लाख १ हजार आणि अखेरची शिल्लक २ लाख ५७ हजार ४०१ अशी जमेऐवढीच खर्च बाजू धरण्यात आली आहे. 

महसुली विभागातून होणार १५७ कोटी वर्ग 

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अंदाजपत्रकात महसुली विभागातून रक्कम भांडवली कामासाठी वर्ग करण्यात येणार आहे. यंदा पाणीपुरवठा विभागाकडून ४ कोटी ९० लाख इतकी भांडवली साठी तर महसुली व पाणीपुरवठा विभागातो १५७ कोटी ४० लाख  असे वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासनाच्या अंदाजामध्ये एकूण ६६ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये वाढ झाली आहे. 

उत्पन्न, अनुदान, कर्जासह एकूण 

अंदाजपत्रक १४४९.७१ कोटींचे

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात महापालिकेला मिळणारे उत्पन्न हे ९९० कोटी ७८ लाख ९३ हजार ४०१ रूपये, शासन अनुदान ३४७ कोटी ९२ लाख आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी महापालिका हिस्सा कर्ज २९ कोटी ४० लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान मल निसारण योजना महापालिका हिस्सा कर्ज ७१ कोटी ६१ लाख आणि यंदा प्रथमच सोलापूर शहर अंतर्गत पाणीपुरवठा सुधारणा योजनेसाठी महापालिका हिस्सा मुन्सिपल बोंड स्वरूपात उभारण्यात येणार असून त्यामधून १० कोटी रुपये असे मिळून एकूण अंदाजपत्रक १४४९ कोटी ७१ लाख ९३ हजार ४०१ रुपये इतका झाला आहे. यंदाचा अंदाजपत्रक हा वाढविण्यात आला असून तो गत वर्षीच्या तुलनेत तब्बल १५६ कोटी ४१ लाख ८० हजाराच्या वाढीने १० टक्क्यांवर वाढला आहे. 

दरवर्षी महसुली तूट; प्रशासनाची हतबलता

अंदाजपत्रक सादर करताना पुढील वर्षातील नियोजन व विकासाची दिशा ठरविणे व गरजेनुसार आवश्यक प्रकल्पांचा विचार करताना जमा व खर्च यात ताळमेळ घालणे आवश्यक आहे. पण महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी महसुली तूट निर्माण होत असून यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे अशी हतबलता सुधारित व या अंदाजपत्रकात प्रशासनाने दर्शविली आहे. ही तूट भविष्यात सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. 

अशी उपलब्ध होणार भांडवली कामासाठी रक्कम 

* विकास शुल्क- २८ कोटी

* महसूल निधीतून भांडवली कामासाठी वर्ग- १५२ कोटी ४९ लाख ३५ हजार 

* गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे- ५१ लाख 

* पाणीपुरवठा निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करणे- ४ कोटी ९० लाख ६६ हजार

* एकूण भांडवली कामासाठी उपलब्ध होणारी रक्कम- १८५ कोटी ९१ लाख १ हजार

ठळक वैशिष्ट्य अशी 

* महापालिका एकूण खर्च- ९९० कोटी ७६ लाख ३६ हजार 

* केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान- ३४७ कोटी ९२ लाख (तेवढेच होणार खर्च) 

* शहरात अतिवृष्टीमुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण होते. याचा विचार करून कुठेही पाणी साचू नये यासाठी काही ठिकाणी बंदिस्त नाले बांधणार.

* मक्तेदारांच्या कामाची थकीत बिले देण्यासाठी १० कोटींची तरतूद. 

कार्यक्रम योजनांवरील खर्च- ६५ कोटी ६ लाख १७ हजार

* करावरील सूट व परतावा यामध्ये प्रशासनाच्या २९ कोटी रुपयांमध्ये १३ कोटी कमी करत ठेवले १६ कोटी

* घसारा निधी ठेवला १ कोटी १५ लाख रुपये

* शहरास स्वच्छ सुंदर व लियाबल सिटी बनविण्याचा प्रयत्न होणार.

असे आहे मागील वर्षांचे बजेट 

दरम्यान , सन 2022-23 चे अंदाजपत्रक 1055 कोटी रुपयाचे होते. मागील 2023 – 24 चे अंदाजपत्रक हे 1075 कोटी 19 लाख रुपयाचे होते. सन 2024-25 चे एकूण 1 हजार 157 कोटी 23 लाख 16 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक होते. यंदा सन 2025 – 26 चे अंदाजपत्रक एकूण 1293 कोटी 30 लाख 13 हजार 401 रुपयाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सन 2026- 27 चे प्रशासकीय अंदाजपत्रक 1383 कोटी 38 लाख 18 हजार 401 रुपये इतके सादर केले आहे. तर मनापासूनभेत मान्यता देण्यात आलेले बजेट एकूण 1449 कोटी 71 लाख 93 हजार 401 रुपये इतके आहे. 

महत्त्वाच्या सूचना व शिफारशी अशा 

सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी मांडलेल्या सूचना व शिफारशी याप्रमाणे –

* सुपर टॅक्स रद्द करून उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.

* महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण करावे.

* वृक्षसंवर्धन व डिव्हायडरवर वृक्षारोपण करावे.

* जयंतीनिमित्त विचार प्रबोधन कार्यक्रम घ्यावेत.

* टीसीआयडीएस अंतर्गत एमआयडीसी सुधारणा कराव्यात.

* एमआयडीसी भागात रुग्णालय, अग्निशामक केंद्र व बागा उभाराव्यात.

* बोगस नळ शोधून कारवाई करावी.

* ओपन स्पेसचे ऑडिट करावे.

* शहर प्रवेशद्वार व दिशादर्शक फलक उभारावेत.

* उत्पन्न वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी.

* सीएनजी /इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत.

* मनपा शाळांत CBSE पॅटर्न लागू करावा.

* विणकर, मार्कडेय, जानकीनगर बागा सुशोभित कराव्यात.

* गोलचावडी दवाखाना सुपर स्पेशालिटीमध्ये रूपांतरित करावा.

* महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधावीत.

* स्मशानभूमी सुधारणा कराव्यात.

* जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारावे.

* जुळे सोलापुरात इनडोअर स्टेडियम बांधावे.

* मनपा दवाखान्यांचे नुतनीकरण करावे.

* प्रमुख रस्त्यांवर वृक्षारोपण करावे.

* अपघात टाळण्यासाठी डिव्हायडर, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग करावे.

* ५४ मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करावा.

* झोपडपट्टीतील पक्क्या घरांवर योग्य कर धोरण लागू करावे.

* थकित रिव्हिजन प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

* नोंद न झालेल्या मालमत्तांचा सर्व्हे करून कर आकारावा.

* विकास आराखड्यासाठी निधी स्थापन करावा.

* सौरऊर्जाधारकांना १० टक्के करसवलत द्यावी.

* १०० टक्के मालमत्ता नोंद व कडक वसुली करावी.

* डिजिटल शिक्षण वाढवावे.

*  प्रदूषण नियंत्रण उपाय तात्काळ राबवावेत.

* भाजी विक्रेते ओट्यावरच बसतील याची अंमलबजावणी करावी.

* मनपा मालमत्तांची तपासणी व नावफलक लावावेत.

* भाजी मंडई वसुली महिला बचत गटांमार्फत करावी.

* स्मशानभूमीत स्वच्छता व पाणी व्यवस्था ठेवावी.

* जलतरण तलावांचे नुतनीकरण करावे.

* झोपडपट्टी पुनर्विकास राबवावा.

* सर्व मिळकती व नळांचा सर्व्हे करावा.

* हद्दवाढ भागात ज्येष्ठ नागरिक केंद्र व सुविधा द्याव्यात.

 * डब्ल्यूटीपी प्लांट उभारून पाणीपुरवठा सुधारावा.

* वक्फ जागांवर रिव्हिजन करून कर वसुली करावी.

भांडवली कामांच्या खर्चाचा तक्ता याप्रमाणे 

रस्ते बांधणे – 3 कोटी ,शहरातील बागांचे सुशोभीकरण करणे, नवीन बाग करणे – 3 कोटी, शहरातील पुतळे परिसर सुधारणा करणे – 2 कोटी , एमआयडीसी भागात विविध सुधारणा करणे (TCIDS अंतर्गत) – 3 कोटी ,

वॉर्ड वाईजकामे – 18.48 कोटी , ड्रेनेज लाईन घालणे व गटारी बांधणे – 3 कोटी , पिण्याची पाईपलाईन घालणे – 3 कोटी , गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे – 51 लाख ,

विविध विकास कामांचे डी.पी.आर. तयार करणे इ. – 4 कोटी ,शहर व हद्दवाढ भागातील विविध विकास कामे करणे – 56 कोटी ,रामवाडी, गोलचावडी व मनपा दवाखाने व प्रसूतिगृह सुधारणा – 3 कोटी, विद्युत दिव्यांची सोय करणे – 2 कोटी ,जागा संपादन करणे, जागा ताब्यात घेणे – 25 लाख ,

स्मशानभूमी सुधारणा करणे – 2 कोटी ,

महिलांसाठी प्रसाधनगृह व पिंक टॉयलेट बांधणे – 1 कोटी, सोलापूर शहर व जुळे सोलापूर भागात नाट्यगृह बांधणे – 1 कोटी , जुळे सोलापूर भागात इंडोअर स्टेडियम बांधणे – 1 कोटी , महापौर सुचवितील ती विकास कामे – 5 कोटी ,

उपमहापौर सुचवितील ती विकास कामे – 3 कोटी ,

 अध्यक्ष स्थायी समिती सुचवितील ती विकास कामे – 3 कोटी , सभागृहनेता सुचवितील ती विकास कामे – 3 कोटी ,महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी CCTV बसविणे – 50 लाख , सीएनएस रोड 54 मीटर रस्ता येथे पथदिवे सोय – 75 लाख , ट्रान्सफॉर्मर पोल शिफ्टिंग – 1.22 कोटी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकास कामे – 50 लाख , शहर व हद्दवाढ भागात नवीन शाळा इमारत बांधणे – 3.36 कोटी ,विविध योजनेंत मनपा हिस्सा – 32.64 कोटी , पावसाळी गटारे स्ट्रॉम ड्रेनेज घालणे – 4 कोटी ,

हद्दवाढ भागात मोजणी व सुधारणा करणे – 2 कोटी ,

लिंगायत भवन बांधणे / बसवेश्वर पुतळा दुरुस्ती – 60 लाख , मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा – 75 लाख ,

रूपाभवानी मंदिर सुशोभीकरण – 50 लाख ,नियोजित मराठा भवन बांधणे – 1 कोटी, नवीन बोअर घेणे – 1.50 कोटी, देगाव स्मशानभूमीसाठी जागा संपादन व सुधारणा – 1 कोटी , सुनील नगर, निलम नगर, आशा नगर, सिद्धरामेश्वर नगर, कलावती नगर एमआयडीसी भागात प्रसूतिगृह व हॉस्पिटल – 2.50 कोटी ,मागील भांडवली कामांसाठी कमी पडणारी रक्कम – 5 कोटी ,घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध कामे – 84.31 लाख , 54 मीटर रस्त्याच्या दुतर्फा जागा विकसित करणे – 1 कोटी ,महापुरुषांच्या जयंती काळात विचार प्रवचन पर्व आयोजित करणे – 1 कोटी , हेडगेवार पटांगण सुधारणा – 50 लाख , विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण, स्मृती उद्यान विकसित व सुधारणा

 – 1 कोटी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधणे – 1 कोटी , दहिटणे स्मशानभूमी सुधारणा – 50 लाख ,बिरोबा मंदिर परिसर सुधारणा – 50 लाख , अमृत नगर गणपती मंदिर सुधारणा – 50 लाख ,

सोलापूर शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका सुरू करणे 1.50 कोटी , मनपा कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम उतरविणे – 3 कोटी असे एकूण 185 कोटी 89 लाख 09 हजार रुपये.

—–

शहराच्या सर्वांगीण विकासासाठीचे अंदाजपत्रक : महापौर कोंड्याल 

सोलापूर शहर विकासाच्या दृष्टीने आदर्शवत आणि महत्त्वपूर्ण असे हे अंदाजपत्रक आहे. वचनपूर्तीचे हे अंदाजपत्रक आहे. यामध्ये रस्ते, मूलभूत सुविधा, हद्दवाढ भागांचा विकास, महिला सुरक्षा, भारतरत्न डॉ. आंबेडकर संविधान भवन, मराठा भवन , 54 मीटर रस्ता यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. 

विशेष म्हणजे, सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजनेचा लाभ देण्यासाठी तीन कोटीची तरतूद या अंदाजपत्रकात केली आहे. हद्दवाढ भागामध्ये प्रसूतीगृह उभारणे त्याचबरोबर स्मशानभूमी आदी कामांचा समावेश आहे. एक सर्वांगीण विकासाचे रोल मॉडेल ठरणारे हे अंदाजपत्रक आहे. सामाजिक समतोलही साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक अशी तरतूद यामध्ये करण्यात आली असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

—–

जाहीरनाम्यातील आश्वासनाची अंदाजपत्रकात

 पूर्तता  : सभागृह नेते नरेंद्र काळे 

या अंदाजपत्रकासंदर्भात बोलताना सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, सोलापूर महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये भाजपाने निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासन आणि जाहीरनाम्यातील मुद्द्यांची पूर्तता करण्यात आली आहे. भाजपच्या वचनपूर्तीचे हे अंदाजपत्रक आहे. उत्पन्न वाढीवर यामध्ये अधिक भर देण्यात आला आहे. मूलभूत सुविधा देण्याबरोबरच नाट्यगृह , इनडोअर स्टेडियम यासह सोलापूर शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तववादी हे अंदाजपत्रक आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या यापुढे नियमित बैठका घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व नगरसेवकांना समान निधी देण्याचे आश्वासनही पूर्ण केले आहे. महापालिका आयुक्तांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात 66 कोटी रुपयांची वाढ मनपा सभेने केली आहे. प्रत्येक झोन कार्यालयअंतर्गतही भरीव तरतूद केली आहे.

भांडवली मूल्य कर आधारित रचनेचा प्रस्ताव नाही 

भांडवली मूल्य आधारित रचनेचा कोणताही प्रस्ताव सभागराकडे आला नाही. यापूर्वीही असे विषय आले होते ते त्यावेळीही घेण्यात आले नव्हते. यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही. काही जणांनी हा झीजीया कर म्हणून वावड्या उठवल्या परंतु हा प्रस्तावच आलेला नाही, असे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.

प्रथमच शहरवासीयांच्या सूचनांसह लोकाभिमुख अंदाजपत्रक : रंजीता चाकोते 

सोलापूर महापालिकेचा नव्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. यंदा प्रथमच नागरिकांकडून घेण्यात आलेल्या सूचना आणि शिफारसी यांचा समावेश या अंदाजपत्रकात करण्यात आला ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. सोलापूर शहरात जास्तीत जास्त सुंदर, हरित, शिक्षण आणि आरोग्य यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय हद्दवाढ भागाकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून यामध्ये विकासासाठीही निधी देण्यात आला आहे. महापालिका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, महिलांसाठी प्रसाधनगृह, बागांची सुधारणाही करण्यात येणार आहे असे स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे ? :  मनीष केत 

  सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नाही. पुरुषांना अनेक पर्याय आहेत मात्र महिला भागनींनी काय करायच? असा महत्वाचा मुद्दा पत्रकार व स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी आज महापालिकेच्या सभागृहात उपस्थित केला. 

 मुंबई महापालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी सोलापूर महापालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी यावेळी केली. महापालिका आर्थिक स्वावलंबी कधी होणार असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. महिला देखील आजपर्यंत इतक्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा असून त्यांनी देखील बोलल पाहिजे अशीअपेक्षा व्यक्त केली.स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांच्या महिला शौचालयाच्या महत्त्वपूर्ण मागणीनंतर नगरसेविका वृषाली चालक्य सभागृहात मनीष केत यांचे आभार मानले.

बेकायदेशीर वसूल केलेली पाणीपट्टी 

परत करण्याची उपसूचना

 महापालिका सभागृहात विरोधी पक्ष म्हणून एमआयएमच्या वतीने उपसूचना मांडण्यात आली. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सर्वांगीण विकास करता यावा यासाठी भांडवली निधी तसेच वार्डवाईज कामांसाठी मोठा निधी सुचविण्यात आला. याबरोबरच सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रत्यक्षात पाणी न देता बेकायदेशीर वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम नागरिकांना परत करण्याची वीस कोटी रुपयांची तरतूद सुचविण्यात आली. शहरातील विशेषतः भागातील विविध विकास कामे सुचविण्यात आल्याची माहिती एमआयएम गटनेत्या वाहिदा भंडाले यांनी सांगितले.

Post Views: 100
Previous Post

८ दिवसांचा अल्टिमेटम; निधी न दिल्यास ‘झेडपी’ला काँग्रेसचा घेराव!

Next Post

वडकबाळ येथील खिलार गायीकडून जुळे वासरांना जन्म

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वडकबाळ येथील खिलार गायीकडून जुळे वासरांना जन्म

वडकबाळ येथील खिलार गायीकडून जुळे वासरांना जन्म

ताज्या बातम्या

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना ‘मानधनाची पहिली भेट #marathinews

May 17, 2026

विणकर बागेत नवीन ओपन जिम चे लोकार्पण

May 17, 2026

कांतारा नव्हे वळसंगचे बाळबट्टल #viral #solapurnews

May 17, 2026

जागर यात्रेने सर्व युवकांना जोडणार कृष्णराज महाडिक

May 17, 2026

नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

May 17, 2026

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868900

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697