दक्षिण सोलापूर – श्री कट्टेव्वादेवी गोशाळा वडकबाळ येथे ब्रह्म मुहूर्तावर खिलार जातीच्या गोमातेने दोन जुळ्या खोंडांना जन्म दिले . गोशाळेतील प्रत्येक गाईंना व खोंडांना नावाने ओळखले जाते. आज रोजी सरस्वती नावाच्या गोमातेने दोन जुळ्या खोंडाना जन्म दिले आहे, त्यांचे नाव नरेंद्र व देवेंद्र असे ठेवण्यात आले.
कारण गोमाते विषयी प्रेम असणारे गोभक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐतिहासिक कार्य असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आम्ही गोशाळेत गोमतांना व्यवस्थित सांभाळ करीत आहोत असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमा बिराजदार सांगितले . त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून गोमातेची सेवा घडो असे प्रार्थना गोमातेच्या चरणी केले.
















