माळशिरस : येथील श्रीराम व श्री हनुमान मंदिरा हनुमान जयंतीनिमित्त पंढरपूर येथील ह भ प कैवल्य महाराज चातुर्मासे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील श्री हनुमानाची स्वयंभू मूर्ती असून शहरासह परिसरातील भाविकांची या मारुतीवर श्रद्धा आहे. हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो .नोकरी व कामानिमित्त परगावी गेलेले भाविक हनुमान जयंती दिवशी नवस पूर्ण करण्यासाठी येतात.
हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी पहाटे ह भ प कैवल्य महाराज यांचे कीर्तन होणार असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे


























