सांगोला – ग्रामविकास आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवार दि.२९ मार्च रोजी आपल्या नियोजित सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जवळा येथील स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व.शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, बाळासाहेब एरंडे, ॲड.सचिन देशमुख, ॲड.यशराजे साळुंखे पाटील, सभापती पूनम इंगवले, नवनाथ मगर, बाळासाहेब काटकर, चंद्रकांत चौगुले, पं.स. सदस्य बापू जावीर, प्रशांत वलेकर, सरपंच सज्जन मागाडे उपस्थित होते.
















