सोलापूर – गुरुवार दिनांक २/४/२०२६ रोजी कै. वि.मो. मेहता प्राथमिक शाळेत इ४थी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मा. श्री सुरेशबाबु मंकणी( नूतन नियमक मंडळ सदस्य) मा. मुख्या. सौ सीमा कोरवलीकर, पालक सौ. सीमा डिगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी श्रुती कुलकर्णी यांनी ‘अशी पाखरे येती’ हे गीत सादर केले. मा. मुख्या. सीमा कोरवलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी आपले ऋण व्यक्त केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून चौथीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या वतीने इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका सौ. सुजाता यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री सुरेशबाबु मंकणी यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिका, मोठे व्हा ,भरपूर ज्ञान मिळवा. असे सांगत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळा समिती अध्यक्ष मा. श्री अनिल बर्वे यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले व शाळेविषयी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता चौथीचे पालक श्री प्रशांत डिगे व श्री संदेश वरेकर यांनी शाळेला ग्रीन मॅट भेट दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मयुरी दुरुगकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ भारती शिंदे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.





















