सोलापूर – अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळांच्या शिक्षक मान्यता तातडीने दयाव्यात व संबंधित कर्मचार्यांचे शालार्थ प्रकरणे उपसंचालक कार्यालयात तातडीने पाठवून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी केली
जिल्हातील माध्यमिक प्राथमिक शिक्षक व शाळांचे प्रलबित प्रकरणे व समस्या याविषयी निवेदन माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप साहेब व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना देण्यात आले.
यावेळी कृती समितीचे जिल्हाअध्यक्ष गुरुनाथ वांगीकर प्रमोद बत्तुल दिपक जळकोटे राजाराम बटाणे सचिन व्हनमाने स्वप्निल वाडकर उपस्थित होते दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी प्रकरणे तातडीने निपटारा करण्याचे आश्वासन दिले .
मागण्या
अल्पभाषीक शाळेतील नव नियुक्त शिक्षकांच्या प्रलंबित मान्यता तातडीने देण्यात याव्यात
वैयक्तीक मान्यता प्राप्त शिक्षकांच्या शालार्थ प्रकरणे आपल्या शिफारसीनुसार तातडीने उपसंचालक कार्यालयात तातडीने पाठविण्यात याव्यात .
टप्पा वरील शाळा कर्मचार्यांची प्रकरणे तातडीने देण्यात यावी .
टप्पावरुन 100 टक्के तुकडीवरील शिक्षकांची प्रकरणे तातडीने आयुक्त कार्यालयात पाठवून दयावी .
वेतनेतर अनुदानीत कॅम्प तातडीने आयुक्त कार्यालयात पाठवून दयावी .
आरटीई मान्यता फाईलविषयी तातडीने कार्यवाई करावी .
पेन्शन फाईलीचा तातडीने निकाल व्हावा.युडायस प्रणाली व स्टुडेंट पोर्टेल वरील माध्यम दुरुस्ती नसल्यामुळे सेवकंसंच सन 2025-26 पेंडीग आहेत . तात्काळ दुरुस्ती व्हावी
“ जिल्हातील अल्पभाषिक शाळेतील नवनियुक्त कर्मचा र्याच्या प्रलंबित मान्यता तातडीने देण्यात याव्यात व शाळासाठीच्या वेतनेत्तर अनुदान कॅम्प घेउुन तातडीने अनुदान वितरण करण्यात याव्यात “.
गुरुनाथ वांगीकर (जिल्हा अध्यक्ष ) महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती




















