सोलापूर : सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील ज्ञानेश्वरी खोसे, वैष्णवी खोसे, मेघना दोडमिसे, श्रुती बंडगर, पूजा बेरे या पाच खेळाडूंची यशस्वी कामगिरीच्या जोरावर कबड्डी राज्य अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर क्रीडा संचालक प्रा. भक्तराज जाधव यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
या स्पर्धांचे आयोजन सिन्नर (जि. नासिक) येथे होत असून, या स्पर्धेत निवड झालेले सर्व खेळाडू सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
खेळाडूंच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ: यशस्वी खेळाडूंसोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. भक्तराज जाधव, डॉ. मधुकर जडल आदी




















