सोलापूर – सोलापूर — विजयपूर महामार्गावरील सोरेगाव ते हत्तुर दरम्यान असणाऱ्या दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झाडांचे साम्राज्य वाढले असून यामुळे वाहन चालकांना जखमा होत आहेत. याकडे राष्र्टीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुभाजकावरील काटेरी झाडे काढण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय महामार्गा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.
सोलापूर — विजयपूर महामार्गावरील सोरेगाव ते हत्तुर पर्यंत असणाऱ्या दुभाजकामध्ये फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र ज्या ठिकाणी फुलझाडे नाहीत त्या ठिकाणी काटेरी बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे दुभाजका जवळून जाणाऱ्या वाहन चालकांना या काटेरी झाडांचा त्रास होत आहे . दुभाजकालगत वाहन घेऊन जाताना काट्यांचा त्रास होत असून अनेक लहान मुलांना या काट्यामुळे जखमा झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने या रस्त्यावरील काटे काढण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात येत आहे .
…,
चौकट
…,
राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे दुर्लक्ष
…
सोरेगाव ते हत्तुर चार किलोमीटरपर्यंत असणाऱ्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढली आहेत. दुचाकीस्वार व वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी असताना दुभाजकाजवळ दुचाकी गेल्यावर लहान मुलांना जखम झाली आहे . त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने त्वरित काटेरी झाडे काढून टाकावे. अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
भीमाशंकर बबलेश्वर, सरपंच भंडारकवठे , तालुका दक्षिण सोलापूर
…,


















