Wednesday, June 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या पुढे पंढरपूरच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे असणार आव्हान

तरुण भारतbyतरुण भारत
April 3, 2026
in editor
0
नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या पुढे पंढरपूरच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे असणार आव्हान
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्या नंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या पुढे तिर्थक्षेत्र पंढरपूरातील प्रलंबित विविध विकास कामांना गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पंढरपूरातील नागरिक तसेच केंद्र व राज्यशासना मध्ये सुवर्णमध्य साधित कार्तिकेयन यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीमप्रोजेक्ट असलेला पंढरपूर काँरिडोर प्रकल्प राबविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची तडकाफडकी नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी शुक्रवारी पंढरपूरात येवून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन सोलापूऱच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून देशभर प्रसिध्द असलेल्या तिर्थक्षेत्र पंढरपूर बद्दल राज्य तसेच केंद्र शासनातील राज्यकर्त्यांचे विशेष लक्ष आहे.कारण केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभर पसरलेल्या वारकरी सांप्रदायाची मने जिंकावयाची असतील तर पंढरपूरचा सर्वांगांने विकास साधणे आवश्यक आहे हे या राज्यकर्त्यांनी अचूक हेरलेले आहे. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी,उज्जैनच्या धर्तीवर तिर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास झाला पाहिजे यासाठी पंढरपूर काँरिडोरची घोषणा केलेली आहे. या संदर्भात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मुंबई येथे मध्यंतरी पंतप्रधानाची तिर्थक्षेत्र पंढरपूरा संदर्भातील भूमिका देखील विषद केलेली आहे.
तिर्थक्षेत्र पंढरपूरचा नावलौकीक येथील विठ्ठल रखुमाईच्या वास्तव्याने देशभर नव्हे तर साता समुद्रापार पोहचलेला आहे. येथे भरणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रांसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. या बरोबरच पंढरपूरात दररोज देखील ५० ते ६० हजार भाविकांचा राबता असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना,शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवासुविधा कशा प्राप्त होतील यासाठी राज्य शासनाकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे पंढरपूरवर विशेष लक्ष आहे. 
त्यामुळेच तिर्थक्षेत्र पंढरपूरसाठी आत्तापर्यंत केंद्र शासनाच्या नमामी गंगेच्या धर्तीवर राज्यशासनाकडून नमामी चंद्रभागा अभियान, वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर काँरिडोर तसेच येथील विठ्ठल मंदिराला पुरातन लुक देण्यासाठी सुरु असलेले विकास काम या बरोबरच पंढरपूरातील अरुंद गल्लीबोळातून मोठ्या यात्रांच्यावेळी मोठी गर्दी होत असल्याने राबविला जाणारा डी.पी.प्लँन आदींची कामे जिल्हाधिकारी कुमार आर्शीर्वाद यांनी काही प्रमाणात मार्गी लावलेली आहे. मात्र आशीर्वाद यांना ती प्रत्यक्ष राबविता आली नाहीत. कारण यासाठी त्यांच्याकडून आत्ता पर्यंत नुसत्या तारीख पे तारीख दिल्या गेल्या. काही दिवसांपूर्वीच पंढरपूर काँरिडोर प्रकल्पास येत्या दोन ते तीन महिन्यात सुरुवात केली जाईल असे आशीर्वाद यांनी जाहीर केले आहे.


वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने कुंभमेळ्या पेक्षा अधिक महत्वाचा असलेला आषाढी यात्रेचा सोहळा देखील अवघ्या दोन ते तीन महिन्यावर येवून ठेपलेला आहे. त्या अगोदर दर तीनवर्षातून एकदा येणारा धोंडा महिना किंवा अधिकमास आहे. त्या महिनाभरात देखील भाविकांची मोठी गर्दी येथे होणार हे गृहित धरुन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पालिका यांच्याकडून योग्य प्रकारे नियोजन करुन घेण्याचे कसब जिल्हाधिकाऱ्यांना पार पाडावे लागणार आहे


विठ्ठल मंदिराचे काम देखील अगदी संथ गतिने सुरु आहे. मध्यंतरी निधी अभावी हे काम देखील ठप्प झालेले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच निधीची तरतूद झाल्याने पुन्हा काम सुरु झालेले आहे. मंदिराचे हे काम देखील दोन, तीन टप्प्यात होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यालाच जर ऐवढा वेळ लागत असेल तर पुढच्या टप्प्यांचे काय असा सवाल देखील महाराज मंडळी तसेच वारकरी भाविकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे सुरु असलेल्या कामासाठी देखील निधीची योग्य प्रकारे तरतूद कशी होईल यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना सतत शासनदरबारी पाठपुरावा करावा लागणार आहे.

काँरिडोर बाबत देखील आशीर्वाद यांनी बऱ्यापैकी काम करुन ठेवलेले आहे. मात्र काँरिडोर प्रकल्पाला मंदिर परिसरातील संभाव्य बाधित नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे मध्यंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार समाधान आवताडे यांनी देखील हा महत्वकांशी प्रकल्प आता शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरात लवकर तो राबविला जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील संभाव्य बाधित नागरिकांशी देखील योग्य प्रकारे संवाद साधुन काँरिडोर प्रकल्प राबविण्याचे कसब पार पाडताना नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा तालुका म्हणून पंढरपूरचा नावलौकीक आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या कार्यकाळात पंढरपूरात केलेल्या विशेष कामांमुळे तो अधिकारी प्रसिध्दीच्या झोतात आल्याचे आपण पाहिलेले आहे आणि ज्याने विशेष मेहनत घेऊन काम केलेले नाही अशा आधिकाऱ्यांना राज्यकर्त्यांकडून नजरेआड केल्याची देखील अनेक नावे सांगता येण्यासारखी आहेत.


त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या समोर तिर्थक्षेत्र पंढरपूरातील एक,एक प्रलंबित विकास कांमाच्या आव्हानांचा डोंगर उभा ठाकलेला आहे. मात्र या मधून जिल्हाधिकारी कसा मार्ग काढून पंढरपूरातील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांना कशी गती प्राप्त करुन देतात हे पाहणे येथील नागरिकांच्या दृष्टीने येत्या काळात ओत्सुक्याचे ठरणारे आहे.

Post Views: 50
Previous Post

उपोषण व्यर्थ, आता निर्णायक लढा!”  कट्टीमनींचा १४ एप्रिलला आत्मदहनाचा इशारा

Next Post

सोलापूर विजयपूर महामार्गावर काट्यांचे साम्राज; राष्र्टीय महामार्गाचे दुर्लक्ष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूर विजयपूर महामार्गावर काट्यांचे साम्राज; राष्र्टीय महामार्गाचे दुर्लक्ष

सोलापूर विजयपूर महामार्गावर काट्यांचे साम्राज; राष्र्टीय महामार्गाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

June 23, 2026

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

June 23, 2026

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

June 23, 2026
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 23, 2026
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

June 23, 2026

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

June 23, 2026

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

June 23, 2026
खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0931674

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697