अकलूज – जैन समाज बांधव व भगिनींनी अकलूज शहरातुन दुचाकी वाहन रॅली काढत भगवान महावीर जन्मकल्याणक प्रभावना महोत्सवाला प्रारंभ झाला.
अकलूज येथील रत्नाई टाउनशीपच्या प्रांगणात श्री सन्मती सेवा दल व अकलूज सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई,पुणे,सोलापूर,सातारा, धाराशिव,अहिल्यानगर व बीड या सात जिल्ह्यांतील जैन समाजाचा भगवान महावीर यांचा २६२५ व्या जन्मकल्याणक प्रभावना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
दोन दिवस साजरा होत असलेल्या महोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी दुपारी जैन समाज बांधव व भगिनींनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीला शुभारंभ उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील,इशिता मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी इंद्रराज दोशी,सतिश व्होरा,मिहीर गांधी,तेजस गांधी, सत्य सत्यजित दोषी निनादचंकेश्वरा जैन समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नाई टाउनशिप येथुन निघालेली रॅली महावीर पथ, गांधी चौक,शिवापूर पेठ,आझाद चौक, जुना पंढरपूर रोड,प्रतापसिंह चौक,बायपास रोड ने नविन बसस्थानक,सदुभाऊ चौक,महावीर स्तंभ मार्गे रत्नाई टाउनशीप येथे रॅलीची सांगता झाली.
सायंकाळी जन्मकल्याणक प्रभावना महोत्सवाच्या मंडपाचे उदघाटन डॉ,सतिश दोशी व कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर आचार्य विनम्र सागर महाराज यांचे धर्म प्रभावाना प्रवचन होऊन मंगल आरती आरती करण्यात आली.यावेळी जीनसेन भट्टरक नांदती यांचा २८ वा वाढदिवस साजरा करुन सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवशीचा समारोप झाला.याप्रसंगी जितेंद्र प्रदीप गांधी यांच्यावतीने महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.





















