मुदखेड – तालुक्यातील येळी माहटी पुलावर टिप्परचे समोरील टायर अचानक फुटल्याने वाहन चालकाचा ताबा सुटला त्यामुळे
टिप्पर थेट गोदावरी नदीत कोसळलं त्यात टीप्पर चालक सुभाष इरबळा मोरे वय वर्ष ५५ राहणार तरोडा नाका नांदेड या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर हा बचावला असल्याची घटना दि.४ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाटी येथील गुनवंत जाधव, पद्माकर ढगे, संतोष ढगे, बळी पाटील, सरपंच अवधूत ढगे यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना वाचवण्यास मदत केली त्यांच्या या प्रयत्नात एकाला जिवनदान मिळाले आहे. तर एकाचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आले आहे.
टीपर गोदावरी नदी पात्रात कोसळले हे टीप्पर गीट्टीने भरलं होतं कि वाळू ने हे मात्र कळू शकलं नाही कारण टीप्पर मध्ये असलेल्या दोघा पैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बचावला.
सध्या येळी माहटी हे अवैध वाळू उत्खनन काढण्यात तालुक्यात अग्रेसर असून या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे.
गेल्या आठवड्यात भरधाव वेगाने एका टिप्पर ने माळकोठा येथे एका युवकाला धडक देऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी हजारो टिप्पर हायवा वाहनाने बेसुमार वेगाने धावत आहेत. याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष झाल्यामुळे अशा घटना वारंवार रोज पाहण्यास मिळत आहे.
दि.४ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात टिप्पर वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट गोदावरी नदी पात्रात कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्याचं गावकरी सांगत आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाला मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर जखमी झालेल्या इसमावर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

























