सोलापूर – मंद्रूप येथील वीज वितरण कार्यालयाकडून वारंवार वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे ऊन्हाळी पिकांना व फळबागांना पाणी देणे मुश्कील बनला आहे. त्यामुळे पिके करपून शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. ऊन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे पिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी द्यावे लागते, मात्र वीज वितरण कार्यालयाकडून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने आठ ते दहा दिवसाला पाणी देण्याची वेळ आली आहे. त्यातही मोटार चालु केल्यावर एक ते दोन तास वीज गायब होत असल्याने विज येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. म्हणून सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन वीज वित्तरण अधीक्षक अभियंता यांना राष्र्टवादी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरूनाथ जोडमोटे यांनी दिले.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कलिंगड, पपई, द्राक्षे, केळी व खरबूञ फळांची शेती वाढली आहे. लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात करूनही वीजेअभावी फळबागा धोक्यात आली आहेत.
शेतीच्या वीजपुरवठ्यासह घरगुती वीजपुरवठाही वारंवार बंद करण्यात येत आहे. वीजबिल थकल्यावर कनेक्शन बंद करण्यासाठी धावपळ करणार्या अधिकार्यांनी बिल भरणार्या ग्राहकांदना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. वीज गायब होत असल्याने अबालवृध्दांना त्रास होत आहे. ऊन्हाळा असल्याने उकाड्याचा त्रास वाढला असून रूग्णांना कासावीस होत आहे. मंद्रूप वीज कार्यालयातून दिवसातून दहा ते पंधरा वेळा वीज बंद करण्यात येत असल्याने इलेक्र्टीक साहीत्यही जळत आहेत. म्हणून शेतकरी व रूग्णांचे त्रास दूर करण्यासाठी आपण मंद्रूप वीजकार्यालयाला सुरळीत व अखंडीत वीजपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा मंद्रूप वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुनाथ जोडमोटे, शिवानंद हिरेमठ , माशाप्पा कोळी, निंगप्पा कुमठेकर , काशिनाथ जेऊरकर , रामचंद्र जोडमोटे, सोमनाथ रेवतगाव, सुभाष गिरगाव, पिंटू अडोळे आदी उपस्थित होते.





















